एआय शिका, नाहीतर नोकऱ्या जातील; गुगलच्या डीपमाईंड सीईओंचा इशारा

एआय शिका, नाहीतर नोकऱ्या जातील; गुगलच्या डीपमाईंड सीईओंचा इशारा

मायक्रोसॉफ्टने अलीकडेच तब्बल 6 हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठवले. त्यापैकी सॉफ्टवेअर अभियंत्यांनी बनवलेल्या एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलीजन्सने त्यांच्याच नोकऱ्या गिळल्या. त्यामुळे आता गुगलचे डीपमाईंड सीईओ डेमिस हासाबिस यांनी एआय शिका, नाहीतर नोकऱ्या जातील असा इशारा दिला आहे. एआय ही तुमच्या पिढीची निर्णायक क्रांती ठरणार आहे. त्यामुळे यात आताच पारंगत व्हा, अन्यथा मागे पडाल, असा सल्लाही त्यांनी तरुणांना दिला आहे.

गुगल डीपमाईंड या अत्याधुनिक संशोधन संस्थेमार्फत पंपनीचे जनरेटीव्ह एआय मॉडेल जेमिनी आणि एजीआय अर्थात आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सच्या दिशेने संशोधन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एआयमध्ये पारंगत होण्याचा सल्ला डेमिस हासाबिस यांनी तरुणांना दिला आहे. अलीकडेच गुगल आय/ ओ परिषदेत बोलताना आणि हार्प पर्ह्प लोकप्रिय पॉडकास्टवर संवाद साधताना त्यांनी पुढील पाच ते दहा वर्षांत एआयमुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ कमी होणार असून पारंपरिक नोकऱ्यांवर गदा येणार असल्याचा दावा केला, परंतु एआयमुळे अधिक नवीन, अधिक मूल्यवान आणि रंजक संधीही निर्माण होतील, असेही ते म्हणाले.

एआय निंजा बना

इंटरनेटने मिलेनियल्स आणि स्मार्टपह्नने जेन झेड पिढी घडवली. त्याचप्रमाणे जनरेटीव्ह एआय ही जेन अल्फाची नवी ओळख बनणार असल्याचे डेमिस म्हणाले. केवळ एआय वापरकर्ते बनू नका, तर एआयममध्ये सखोल ज्ञान असलेले एआय निंजा बना, असा सल्लाही डेमिस यांनी तरुणांना दिला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांची भक्कम तयारी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

तांत्रिक कौशल्यावर भर नको

केवळ तांत्रिक कौशल्यावर भर न देता  मेटा स्किल्स विकसित करण्याचे महत्त्वदेखील त्यांनी तरुणांना पटवून दिले. सध्याच्या घडीला तंत्रज्ञानाचा वेग पाहता अनेक गोष्टी एआयच्या माध्यमातून करून घेतल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन ज्ञान वाढवण्याची आणि नवनवीन टूल्सवर काम करण्याची गरज असल्याचे डेमिस हासाबिस यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;