मला माझ्या वडिलांनी लहानपणीच सोडून दिलं होतं! अभिनेत्री रेखाने सांगितल्या वडिलांच्या कटू आठवणी
रेखा बाॅलीवूडमधील अशी अभिनेत्री जिच्या मादक सौंदर्यांने कित्येकांना घायाळ केलं. असं असलं तरी रेखाने वैयक्तिक आयुष्य हे कायमच गुपित ठेवलं. रेखाच्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक गोष्टी या बाहेरच आल्या नसल्याने, रेखाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कायम अप्रुप वाटत राहिलं. रेखाने ती साऊथ सुपरस्टार जेमिनी गणेशन यांची मुलगी असल्याचेही अनेक वर्षे लपवले होते. 40 वर्षांच्या करिअरमध्ये रेखाने 180 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रेखाचं एकूणच आयुष्य पाहता, खूप खडतर प्रवासाने भरलेलं रेखाचं आयुष्य आहे हे दिसून येतं.
रेखा ख्यातनाम अभिनेत्री झाल्यानंतर, सिम्मी गरेवालच्या शोमध्ये वडिलांविषयी विचारलं होतं. त्यावर त्या इतकंच म्हणाल्या, मला वडिल काय असतात हेच माहीत नाही. रेखाचे वडिल जेमिनी गणेशन हे होते. रेखाचे वडिलांशी संबंध कधीच चांगले नव्हते.
रेखा लहान असतानाच, त्यांचे वडील त्यांना सोडून गेले होते. त्यामुळे त्यांच्या आठवणीदाखल रेखा म्हणतात, ते कधी आमच्या घरी राहिले हेही मला आठवत नाही. त्यांची सगळी मुलं आमच्यासोबत एकाच शाळेत शिकायची. अनेकदा ते इतर मुलांना सोडायला शाळेत यायचे, तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं. मी त्यांना पाहून म्हणायचे, अरे हे तर अप्पा आहेत. मला कधीच त्यांना भेटण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी मला कधीच पाहिले नाही. वडील म्हणजे काय त्याचा अर्थही मला कळत नव्हता. माझ्यासाठी फादर म्हणजे चर्चचे फादर. वडिलांचे प्रेम आईच्या प्रेमापेक्षा वेगळे असते, परंतु मला ते कधीच मिळाले नाही.’
वडिलांसोबत असलेल्या कटू आठवणींमुळेच, चित्रपटसृष्टीत आल्यानंतर रेखाने अनेक वर्षे ती साऊथ सुपरस्टार जेमिनी गणेशन यांची मुलगी आहे हे लपवून ठेवले होते. 1950 ते 1980 दरम्यान जेमिनी गणेशन हे तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात रोमँटिक नायक होते. त्यांना कधल मन्नन म्हणूनही ओळखले जात असे. ते इतके देखणे होते की, त्यांना कधीही वाईट भूमिका दिल्या जात नव्हत्या. जेमिनी गणेशन यांनी कधीही रेखाला आपली मुलगी म्हणून स्वीकारले नाही किंवा तिच्या आईला पत्नीचा दर्जा दिला नाही.
जेमिनी गणेशन जितके प्रसिद्ध होते तितकेच ते वादांनी वेढलेले होते. अभिनेत्री रेखा आणि तिच्या आईसोबत जेमिनीचे नाते नेहमीच वादग्रस्त राहिले. पडद्यावरील रोमान्सच्या राजाच्या आयुष्यात जितके रोमान्स होते तितकेच वादही होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List