ठाण्यातील हजारो कोटींच्या जमीन घोटाळ्यावर कारवाईत टाळाटाळ, फडणवीसांचे आदेश पोलिसांकडून पायदळी; अंबादास दानवे यांचा आरोप

ठाण्यातील हजारो कोटींच्या जमीन घोटाळ्यावर कारवाईत टाळाटाळ, फडणवीसांचे आदेश पोलिसांकडून पायदळी; अंबादास दानवे यांचा आरोप

ठाणे येथील एका ट्रस्टची सुमारे दीड हजार कोटी रुपये किमतीची 65 एकर जमीन एका खासगी संस्थेला कवडीमोल दरात हस्तांतरीत करण्यात आली. त्याप्रकरणी चौकशीचे आदेश फडणवीस यांनी दिले होते; परंतु पोलिसांकडून कारवाईत जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला असून मुख्यमंत्र्यांनी याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील रतनशी प्रेमजी चॅरिटेबल ट्रस्टची ही जमीन वडवली व ओवळे या भागात आहे. बिल्डरांना फायदा पोहोचवण्यासाठी ठाणे महानगरपालिका, महसूल विभागातील अधिकारी आणि ट्रस्टच्या विश्वस्तांनी संगनमत करून ती जमीन फेनकिन इन्फोटेक एलएलपी या खासगी संस्थेला अवघ्या 70 कोटी रुपयांमध्ये हस्तांतरीत केली. उच्च न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेत याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश 7 मार्च रोजी दिले होते. धर्मादाय आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयावर याप्रकरणी चौकशी केली जाईल, अशी घोषणा विधिमंडळात केली होती आणि तसे लेखी निर्देशही दिले होते.

खोटी कागदपत्रे आणि बिल्डर्सचा सहभाग

महसूल विभागातील तहसीलदार व तलाठी यांनी नोंदणीपृत दस्तावेज प्रलंबित असतानाही ट्रस्टच्या सातबारा उताऱ्यावर फेनकिन इन्पह्टेक एलएलपी संस्थेच्या नावे नोंद केली. हे सगळे प्रकरण हे अतिशय पद्धतशीरपणे बनावट कागदपत्रे तयार करून जमीन विकण्यासाठी करण्यात आले आहे. बँक खात्यात दीडशे रुपयेही नसलेल्या केसरियाजी पॅपिटल नावाच्या नॉन बँकिंग एनडीएफसीकडून 120 कोटी रुपयांचे हमीपत्र घेऊन ते धर्मादाय आयुक्तांकडे सादर करण्यात आले. ठाण्यातील अनेक मोठे बिल्डर्स यात गुंतलेले आहेत, असे नमूद करून सदर ट्रस्ट बरखास्त करावी आणि त्यावर प्रशासक नेमावा, अशीही मागणी दानवे यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : ‘त्या’ लाडक्या बहिणींना योजनेतून वगळलं; आदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट Ladki Bahin Yojana : ‘त्या’ लाडक्या बहिणींना योजनेतून वगळलं; आदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली...
नायजेरियात मुसळधार पावसामुळे पूर, 88 नागरिकांचा मृत्यू
Palghar News – केळवेमध्ये रिसॉर्टमध्ये प्रियकराकडून अल्पवयीन प्रेयसीवर गोळीबार, मुलीची प्रकृती चिंताजनक
हृदयविकाराचा झटका येण्याआधी 2 दिवस ‘ही’ 6 लक्षणे दिसतील, तुम्हीही दुर्लक्ष करु नका?
Mumbai Hit & Run – जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर डंपरची स्कूटरला धडक, महिलेचा जागीच मृत्यू; आरोपी फरार
Chandrapur News – ताडोबाचे बफर झोन मोडून हत्ती गावात शिरले, गावकऱ्यांची झाली दमछाक; पाहा Video
रत्नागिरी जिल्ह्यातील तीन धरणात 100 टक्के पाणीसाठा