शहापुरात वीज कोसळून पाच वर्षांत 24 बळी; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आदिवासींचा जीव मुठीत

शहापुरात वीज कोसळून पाच वर्षांत 24 बळी; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आदिवासींचा जीव मुठीत

>> नरेश जाधव

शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम पठारी भागातील खेड्या-पाड्यात दरवर्षी वीज कोसळून मोठ्या प्रमाणात वित्तीय व जीवितहानी होण्याच्या घटना घडत असतात. मागील पाच वर्षांत या अस्मानी संकटात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. यावर उपाय म्हणून वीजरोधक मनोरे उभारण्याची वारंवार मागणी केली जात आहे. मात्र तरीही हे मनोरे कागदावरच राहिले आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आदिवासींना दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे.

तालुक्यातील खर्डी, दहिगाव, भोसपाडा, शिरोळ, बिरवाडी, अजनुप, धामणी, अघई, वेळुक, वाशाळा तसेच टाकीपठार परिसरातील सावरोली, सोगाव, कानडी, आपटे, खराडे, ढाढरे, डेहणे, नडगाव, खरिवली, किनव्हली या ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे 25-30 गावपाड्यांना दरवर्षी चक्रीवादळ, वीज कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. सावरोली, खरपत, नामपाडा, बेलकडी, गांगणवाडी, हिरव्याचीवाडी, झापवाडी, टाकीचीवाडी, उंबरवाडी, रिकामवाडी, फणसवाडी, आंबेखोर, कवट्याचीवाडी येथेही दरवर्षी वीज कोसळून अनेकांचे जीव जातात.

किती बळी गेल्यावर जाग येईल?
गेल्या 5 वर्षांत वीज कोळून 24 नागरिक आणि 50 हून अधिक जनावरे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी वीज पडून 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. वीज कोसळून अनेकांचे बळी गेले आहेत. आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल. याला आळा घालण्यासाठी वीजरोधक मनोरे बसवावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख जानू हिरवा यांनी केली आहे.

तालुक्यातील प्रत्येक मंडळ अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात एक व किनव्हली परिसरात दोन वीजरोधक मनोरे बसवण्यात यावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात येत आहे.
परमेश्वर कासुळे, तहसीलदार.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;