मीरा-भाईंदरमध्ये महायुतीत महाफुटी, सरनाईकांविरोधात भाजपचा लेटर बॉम्ब; सरनाईक म्हणतात करा माझी चौकशी

मीरा-भाईंदरमध्ये महायुतीत महाफुटी, सरनाईकांविरोधात भाजपचा लेटर बॉम्ब; सरनाईक म्हणतात करा माझी चौकशी

मीरा-भाईंदरमध्ये मिंधे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कामामुळे महायुती सरकार बदनाम होत असल्याने त्याविरोधात नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना लेखी तक्रार करत कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपच्या लेटर बॉम्बमुळे मिंधे गटाने थयथयाट केला असून जैन यांनी 72 तासांत माफी मागावी अन्यथा 10 कोटी रुपयांचा मानहाणीचा दावा दाखल करू अशी नोटीस दिली आहे. दरम्यान सरनाईक यांनीही खुशाल माझी चौकशी करा असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

अवकाळी पावसाने मीरा-भाईंदरमधील मच्छीमारांचे नुकसान झाले आहे. त्यात सुखी मासळी व बोटींचे नुकसान झाले आहे. नालेसफाई न झाल्यामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. खड्डे दुरुस्ती झालेली नाही. सिमेंट रस्ते अर्धवट आहेत. मात्र या सर्वांचे भाजप आणि मिंधे गटाला काहीही पडलेले नाही.

मीरा-भाईंदरमध्ये मिंधे व भाजप गटात काहीच आलबेल नाही. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी पदाधिकारी सोडत नाहीत. भाजप आणि मिंधेंचे आपापसातले हेवेदावे आणि भ्रष्ट कारभारामुळे मीरा-भाईंदरचा विकास मात्र ठप्प झाला आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून एकमेकांची उणीदुणी काढण्यात पदाधिकारी व्यस्त आहेत.

सरनाईकांची पोलखोल
प्रताप सरनाईकांनी वरसावे, घोडबंदर, काजूपाडा व चेना परिसरात जमिनी खरेदी करून शासनाचा 150 कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. तसेच तिथे ताब्यात नसलेल्या रस्त्यापोटी पालिकेला 29 कोटी रुपये देण्यास भाग पाडले. शेकडो
झाडांची कत्तल करून ईको सेन्सेटिव्ह झोनमध्ये बांधकामे केली आहेत. सरनाईक यांच्या बेकायदा कामामुळे सरकारची बदनामी होत असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी केला आहे.

जैन यांना नोटीस
मिंधे गटाचे वकील राजदेव पाल यांनी भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांना नोटीस पाठवली आहे. जैन यांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेले सरनाईक यांच्यावरील आरोपाचे पत्र मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा 10 कोटींचा दावा दाखल करू असा इशारा दिला आहे. शिवाय भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीची मागणीही मिंधे गटाने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;