मुंबईकरांनो छत्री बाळगा, पुढच्या 24 तासांत गडगडाटी वादळासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा

मुंबईकरांनो छत्री बाळगा, पुढच्या 24 तासांत गडगडाटी वादळासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा

राज्यात मान्सून दाखल झाला आहे. पुढच्या 24 तासांच मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने म्हटले आहे की पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ आकाशासह गडगडाटी वादळे आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तापमान हे कमाल आणि किमान अनुक्रमे ३३°C आणि २४°C च्या आसपास असेल असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, तसेच 40 ते 50 किमी वेगाने वारा वाहून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भातीही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;