जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश; LeT च्या दोन दहशतवाद्यांना अटक, AK-56 रायफलसह मोठा शस्त्रसाठा जप्त

जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश; LeT च्या दोन दहशतवाद्यांना अटक, AK-56 रायफलसह मोठा शस्त्रसाठा जप्त

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून दहशतवाद्यांविरुद्ध शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. या शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

जम्मू-कश्मीरमधील शोपियान जिल्ह्यामध्ये लश्कर-ए-तोयबाच्या दोन हायब्रीड दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. इरफान बशीर आणि उजैर सलामा अशी अटक करण्यात आलेल्या हायब्रीड दहशतवाद्यांची नावे आहेत. शोपिया जिल्ह्यातील बास्कुचन भागात 44 आरआर आणि सीआरपीएफच्या 178 व्या बटालियनने बुधवारी संयुक्तपणे ही कारवाई केली.

बास्कुचन भागातील एका बागेमध्ये लश्करच्या दोन दहशतवाद्यांच्या संशयित हालचाली सुरू असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर शोपियान पोलीस आणि सीआरपीएफने परिसराला वेढा घातला. सुरक्षा दलाने कोंडी केल्याने इरफान बशीर आणि उजैर सलाम यांनी आत्मसमर्पण केले. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून दोन एके-56 रायफल, 4 मॅगझीन, 102 काडतुसं (7.62x39mm), 2 हँड ग्रेनेड, 2 पाउच, रोकड, एक मोबाईल फोन, एक स्मार्टवॉच, दोन बिस्किट पॅकेट आणि एक आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे शोपियान पोलिसांनी सांगितले.

पहलगाममध्ये ओमर अब्दुल्ला यांची विशेष मंत्रिमंडळ बैठक; म्हणाले, दहशतवाद पर्यटन रोखू शकत नाही

हायब्रीड दहशतवादी म्हणजे काय?

हायब्रीड दहशतवादी पूर्ण वेळ दहशतवादी कारवाया करत नाहीत. शालेय किंवा महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या किंवा शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांना दहशतवादी कारवायांमध्ये आणले जाते. त्यांना मोहिमा दिल्या जातात. दिलेल्या लक्ष्यावर हल्ला केल्यानंतर ते पुन्हा आपले सामान्य जीवन जगतात आणि सामान्य नागरिकांप्रमाणे वावरतात. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणेही अवघड जाते.

हे वाचा – जम्मू कश्मिरमधील मशिदीची दुरुस्ती करण्यासाठी हिंदुस्थानी सैन्य सरसावले! पाकिस्तानच्या गोळीबारात स्थानिक मशिदीचे नुकसान

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IPL 2025 – रोहितचा झंझावात आणि गुजरातवर मुंबई वरचढ; 20 धावांनी पराभव करत काढलं स्पर्धेतून बाहेर IPL 2025 – रोहितचा झंझावात आणि गुजरातवर मुंबई वरचढ; 20 धावांनी पराभव करत काढलं स्पर्धेतून बाहेर
मुंबईचा राजा म्हणून ख्याती मिळवलेल्या रोहित शर्माने 50 चेंडूंमध्ये 81 धावांची वादळी सलामी देत संघाला धुवाँधार सुरुवात करुन दिली. त्याला...
वैष्णवीच्या मुलाचा सांभाळ करण्याची जबाबदारी आजी स्वाती कस्पटे यांच्याकडे, बाल कल्याण समितीचा निर्णय
भाजपचा युटर्न! घर घर सिंदूर कॅम्पेन केले रद्द? लोकांच्या टीकेनंतर घेतला निर्णय?
Vaishnavi Hagawane Case – आयपीएस जालिंदर सुपेकरांना दणका, उपमहासमादेशक होमगार्ड पदावर बदली
मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तेलंगणा कनेक्शन समोर
Sindhudurg News – आठवडाभरापासून बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला, देवगड पोलिसांकडून तपास सुरू
तु पागल आहेस, पण तुझी बायको सुंदर आहे…; मित्र उडवायचे खिल्ली, तरुणाने उचललं टोकाच पाऊल