भाजीपाल्याच्या आडून गोमांसाची तस्करी, कसारा घाटातील अवघड वळणावर टेम्पो पलटी

भाजीपाल्याच्या आडून गोमांसाची तस्करी, कसारा घाटातील अवघड वळणावर टेम्पो पलटी

कसारा घाटातील अवघड वळणावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो पलटी झाली. ही घटना आज पहाटे घडली. या अपघातानंतर डाळिंब, भाजीपाल्याच्या आडून टेम्पोत ठेवलेले गोमांस रस्त्यावर पडले आणि गोमांस तस्कराचे बिंग फुटले. अपघात झाल्यानंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अपघातामुळे महामार्गावर अर्धा तास वाहतूककोंडी झाली होती.

टेम्पोच्या दर्शनी भागात डाळिंबाच्या पेट्या व भाजीपाला रचून आतील बाजूने गोमांस घेऊन जाणारा टेम्पो गाडीचा एक्सेल तुटल्याने कसारा घाटातील बिबळवाडी वळणावर पलटी झाला. या अपघातात टेम्पोमधील 5 ते 6 जणांवराचे गोमांस रस्त्याच्या बाजूला पडले. अपघाताची माहिती मिळताच कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टेम्पो रस्त्याच्या बाजूला करण्यात आला. गोमांस दुसऱ्या पिकअपमध्ये भरून टेम्पो चिंतामण वाडी पोलीस चौकीत जमा करण्यात आला.

सराईत चोरट्याला बेड्या
भिवंडी : शहरातील दुचाकी आणि मोबाईल लांबवणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे. अक्षय वर्मा उर्फ शिवा (28) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी नऊ गुन्ह्यांची उकल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा दुचाकी व तीन महागडे मोबाईल असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

घरफोड्या पसार
भिवंडी : लग्नासाठी शहराबाहेर गेलेल्या पाटील कुटुंबीयांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घर फोडले व घरातील रोख रक्कम, चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला. दिघाशी गावात ही घटना घडली असून चोरट्यांनी घरातील 38 लाख 600 रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;