दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद करा, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची मागणी

दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद करा, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची मागणी

दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद करा, अशी मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल असे मत नायडू यांनी व्यक्त केला आहे.

तेलुगू देसम पक्षाच्या एका सभेत बोलताना नायडू म्हणाले की देशात 500 आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्या पाहिजे. लोकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहार करावे असे आवाहन केले आहे.

नायडू म्हणाले की जेव्हा मी पंतप्रधान मोदींना डिजिटल करन्सीवर अहवाल दिला होता. तेव्हा त्यांना म्हटलं होतं की 500, हजार आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या पाहिजेत. डिजिटल व्यवहार वाढवला पाहिजे. जर कोणी भ्रष्टाचार करत असेल तर आपल्याला ताडीने लक्षात येईल असे नायडू म्हणाले होते.जगात ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे आपणही ऑनलाईन व्यवहार वाढवले पाहिजे असे नायडू यांनी सांगितले.

पक्षासाठी दान करण्यासाठी पूर्वी संपूर्ण यादी पहावी लागत होती, आता फक्त क्युआर कोड वरून दान करता येतं. आता पूर्वीसारखं 500, 100 आणि 2000 रुपयांची नोट वाचवण्याची गरज नाही असेही नायडू यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;