शेअर मार्केट गुंतवणुकीच्या बहाण्याने कोट्यवधीचा गंडा; दोघांना अटक, दक्षिण सायबर पोलिसांची कारवाई

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या बहाण्याने कोट्यवधीचा गंडा; दोघांना अटक, दक्षिण सायबर पोलिसांची कारवाई

शेअर मार्केटमध्ये गुंतवा आणि मोठा नफा कमवा असे आमिष दाखवून एका अकाऊंटंटची कोट्यवधीची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दक्षिण सायबर पोलिसांनी अचूक तपास करत फसवणूक केलेली रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वळते करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी व्हॉट्सअॅपचा एक ग्रुप बनवून त्यात व्यवसायाने अकाऊंटंट असलेले निखिल (21) याच्याशी चॅटिंग करून  वेळोवेळी निखिल यास शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास उद्युक्त केले. पैसा गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल असे खोटेनाटे सांगून भामट्यांनी निखिलचा विश्वास संपादन केला. फसवणूक करणाऱ्यांच्या बतावणीला बळी पडून निखिलने मोठा परतावा मिळेल या लोभापोटी वेगवेगळ्या बँक खात्यात तीन कोटी 63 लाख 27 हजार रुपये वळते केले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निखिलने फसवणूक करणारे तसेच ज्यांच्या बँक खात्यात पैसे वळते केले त्या खातेधारकांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदपुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश भोये  व पथकाने तपास सुरू केला.

काशिमीरा आणि गोरेगावातून दोघांना पकडले

निखिलने भामट्यांच्या सांगण्यावरून त्याच्या बँक खात्यावरून इंडस्इंड बँकेच्या एका खात्यात 70 लाख पाठविले होते. त्या खात्यातून चार लाख 89 हजार  रुपये इतकी फसवणुकीची रक्कम त्या खातेधारकाने धनादेशाद्वारे काढली होती. त्यामुळे पथकाने काशिमीरा येथे राहणारा तो खातेधारक अदनान खान याला ताब्यात घेतले. या गुह्यात त्याचा सहभाग निश्चित झाल्याने त्याला अटक करण्यात आली. तसेच निखिलने ऑक्सिस बँकेच्या एका खात्यावर चार ट्रान्झेक्शनद्वारे 19 लाख रुपये पाठविले होते. त्या बँक खात्यावरून पुन्हा वेगवेगळ्या खात्यांवर पैसे वळते केल्याचे तपासात आढळून आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;