टॅरिफ बेकायदेशीर! अमेरिकन न्यायालयाचा ट्रम्प यांना मोठा धक्का, हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्षाचा युक्तीवादही फेटाळला

टॅरिफ बेकायदेशीर! अमेरिकन न्यायालयाचा ट्रम्प यांना मोठा धक्का, हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्षाचा युक्तीवादही फेटाळला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाला आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले परस्पर टॅरिफ हे बेकायदेशीर असल्याचे घोषित केले आहे. न्यायालयाचा हा निर्णय ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांना मोठा धक्का मानला जात आहे. मॅनहॅटन आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयातील तीन न्यायाधीशांनी बुधवारी असा निर्णय दिला की, ट्रम्प यांनी काही टॅरिफ लादण्यासाठी आणीबाणी कायद्याचा गैरवापर केला आहे. मुख्य बाब म्हणजे यावर ट्रम्प प्रशासनाकडून हिंदुस्थान पाकिस्तान संघर्षाचा युक्तिवाद दाखल करण्यात आला होता, तोही न्यायालयाने फेटाळला आहे.

न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अमेरिकन फ्युचर्स मार्केटमध्ये मोठी तेजी आली. डाऊ फ्युचर्समध्ये सुमारे 450 अंकांची वाढ दिसून आली. न्यायालयाच्या निर्णयानंतर अमेरिकन डॉलरमध्येही वाढ दिसून आली. डॉलर निर्देशांकही उडी मारत 100 च्या वर जात असल्याचे दिसून आले. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली.

या निर्णयाला आव्हान देत ट्रम्प प्रशासनाने फेडरल कोर्टात अपील केले आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले की, या निर्णयाविरुद्ध फेडरल कोर्टात अपील करण्यात आले आहे. आर्थिक आणीबाणीला तोंड देण्यासाठी टॅरिफ हा निर्णय घेतला जातो. असे निर्णय निवडून न आलेल्या न्यायाधीशांनी घेऊ नयेत. ते म्हणाले की, परदेशांकडून अमेरिकेला मिळणारी असमान वागणूक ही देशाच्या व्यापार तुटीचे कारण आहे.

2 एप्रिल रोजी ट्रम्प यांनी एका व्यापक कार्यकारी आदेशानंतर जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून आली. या आदेशामुळे बाजारपेठेत ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आणि नंतर त्यात सुधारणा झाली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे ट्रम्पचे बहुतेक शुल्क अवैध ठरले आहे. यात जागतिक फ्लॅट टॅरिफ, चीनवरील वाढलेले टॅरिफ आणि चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवरील फेंटॅनिल-संबंधित टॅरिफ यांचा समावेश आहे.

न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयानुसार, ट्रम्प यांनी जागतिक स्तरावरील लादलेले टॅरिफचा आदेश आणीबाणी कायद्याच्या कक्षेबाहेर आहे. कॅनडा आणि मेक्सिकोवर अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आधारे लादलेले शुल्क देखील बेकायदेशीर मानले गेले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;