तहव्वूर राणाच्या याचिकेवर तिहार जेल, एनआयएला नोटीस; कुटुंबीयांशी बोलण्याची परवानगी हवी

तहव्वूर राणाच्या याचिकेवर तिहार जेल, एनआयएला नोटीस; कुटुंबीयांशी बोलण्याची परवानगी हवी

कुटुंबीयांशी बोलण्याची परवानगी मागणारी याचिका मुंबईवरील ‘26/11’ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याने न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेवर दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने तिहार जेल प्रशासन आणि एनआयएला उत्तर देण्याबाबत नोटीस जारी केली आहे.

राणाच्या याचिकेवर एनआयए न्यायालयाचे विशेष न्यायमूर्ती चंदर जीत सिंह यांच्यासमोर सुनावणी झाली. पुढील सुनावणी 4 जून रोजी होणार आहे. याआधी 24 एप्रिल रोजी पटियाला हाऊस न्यायालयाने राणाची याचिका फेटाळली होती. राणा सध्या न्यायिक कोठडीत असून 9 मे रोजी राणाला 6 जूनपर्यंत ही कोठडी देण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;