रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आलेल्या 100 कोटींच्या निधीचे काय झाले? शिवसेनेचा सवाल, रेल्वे कार्यालयाबाहेर आंदोलन

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आलेल्या 100 कोटींच्या निधीचे काय झाले? शिवसेनेचा सवाल, रेल्वे कार्यालयाबाहेर आंदोलन

पुणे रेल्वे स्थानकावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, त्यांच्या सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बुधवारी रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयाबाहेर आंदोलन केले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 2023 मध्ये दिल्ली रेल्वे बोर्डाकडून आलेल्या 100 कोटी रुपयांच्या निधीचा काय उपयोग झाला? असा सवाल शिवसैनिकांनी विचारला.

रेल्वे स्थानकावर नव्याने 120 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. दिनांक 23 मार्च 2023 रोजी तत्कालीन डीआरएम यांनीही हे स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, अद्यापि एकही नवीन कॅमेरा बसविण्यात आलेला नाही. ‘पुणे स्टेशनची अवस्था ‘आओ-जाओ घर तुम्हारा’ झाली आहे, असा आरोप संतप्त शिवसैनिकांनी केला. स्टेशनवरील जुन्या झालेल्या 59 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी बहुतांश निकामी झाले असून, नवीन कॅमेरे बसवले गेले नाहीत. त्यामुळे 100 कोटींचा निधी कुठे गेला? प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या निधीचा अपहार झाल्याचा संशय जनतेमध्ये निर्माण झाल्याचे यावेळी शिवसेनेने स्पष्ट केले. रेल्वे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यात त्यांनी 59 जुने सीसीटीव्ही कॅमेरे निकामी झाल्याचे मान्य करून 30 जूनपर्यंत 166 नवीन सीसीटीव्ही बसविले जातील, असे आश्वासन दिले.

आंदोलनात शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य संघटक वसंत मोरे, उत्तम भुजबळ, राजेश मोरे, अनिल परदेशी, किशोर रजपूत, रुपेश पवार, महिला आघाडी निवडणूक समन्वयक विद्या होडे, ज्योती चांदेरे, रोहिणी कोल्हाळ, सविता गोसावी, विजया बेंगळे, नसीम कांबळे, पार्वती कांबळे, संपदा कांबळे, योगेश इंगुळकर, पंकज बरिदे, सागर गंजकर, संजय व्हालेकर, अजय परदेशी, गिरीश गायकवाड, मनीष सिंग, संजय लोहोट, राहुल शेडगे, संतोष होडे, बंडूनाना बोडके, नागेश खडके, किशोर रजपूत, जुबेर शेख, नितीन निगडे, विजय पालवे, अभिषेक जगताप, दत्तात्रय घुले, प्रकाश पुजारी, विजय रावडे, मिलिंद पत्की, अजय परदेशी, प्रवीण रणदिवे, साहिल पिरजादे, जुबेर तांबोळी, संतोष गवळी, महेश मोरे, सागर लांडगे, संतोष बनसोडे, नितीन जगताप, नितीन शेलार, जयवंत गिरी, मेजर खोमणे, मंगेश रासकर, मोहन पांढरे, अशोक रसाळ आदी उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मी स्वतःहून पक्ष सोडला नाही, तर देवेंद्र फडणवीस यांनी… राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचा तो मोठा गौप्यस्फोट मी स्वतःहून पक्ष सोडला नाही, तर देवेंद्र फडणवीस यांनी… राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचा तो मोठा गौप्यस्फोट
मराठवाड्यातील नांदेडमध्ये काही नेत्यांमध्ये विस्तव सुद्धा जात नाही. राजकीय आघाड्या-बिघाड्यांनी गेल्या तीन-चार वर्षात राज्याचे राजकारण पुरतं बदलून गेले आहे. युती-महायुती,...
पश्चिम रेल्वेचा 36 तासांचा मोठा मेगा ब्लॉक, 162 लोकल रद्द, रेल्वेच्या शेड्यूलमध्येही बदल
वयाच्या 44 व्या वर्षी कपूर घराण्याची लेक करतेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाली, ‘आता वाट पाहणं शक्य नाही …’
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण – शस्त्र परवान्यासाठी हगवणे बंधूंकडून बनावट कागदपत्रे
मराठी टिकविण्याचा प्रयत्न अभ्यासक्रमातून झाला पाहिजे! सुषमा अंधारे यांचे मत
विमानतळबाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना उभी राहील! खासदार संजय राऊत यांची पुरंदरवासीयांना ग्वाही
पुणे पालिकेचा 66 कोटींचा कचरा प्रकल्प वादात! जागा निश्चित नाही; निविदाही संशयाच्या भोवऱ्यात