अहिल्यादेवी स्मृतीस्थळ आणि तीर्थस्थळांसाठी साडे पाच हजार कोटींचा निधी, राज्य सरकारचा निर्णय

अहिल्यादेवी स्मृतीस्थळ आणि तीर्थस्थळांसाठी साडे पाच हजार कोटींचा निधी, राज्य सरकारचा निर्णय

राज्य सरकारने मंदिर आणि तीर्थस्थळ विकासासाठी साडे पाच हजार कोटींचा रुपयांचा निधी जाहीर केला आहे. राज्य सरकारचे नुकतेच अहिल्यानगरमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. अहिल्यानगरमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळासाठी राज्य सरकारने 681.3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुढच्या तीन वर्षात या स्मारकाचे काम पूर्ण होईल.

फक्त अहिल्यानगरच नाही तर राज्यातील तीर्थस्थळांसाठी 5 हजार 503 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात अष्टविनायक मंदिरासाठी 147.8 कोटी, तुळजाभवानी मंदिरासाठी 259.6 कोटी, ज्योतिबा मंदिरासाठी 259.6 कोटी, त्र्यंबकेश्वर मंदिरासाठी 275 रुपये, महालक्ष्मी मंदिरासाठी 1 हजार 445 कोटी तर माहुरगडाच्या विकासासाठी 829 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

बुधवारी झालेल्या बैठकीत सात प्रकल्पांपैकी चार प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यापैकी 147.8 कोटी रुपयांच्या अष्टविनायक मंदिराच्या विकास प्रकल्पाचा समावेश आहे. त्यापैकी 100 कोटी रुपये हे मंदिरांसाठी तर 47.4 कोटी रुपये हे मंदिरांच्या विद्युतीकरण आणि वास्तूशास्त्रीय सल्लागारासाठी देण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;