पावसाचा जोर ओसरला… ज्वर पसरला! सर्दी, खोकला आणि तापाच्या साथीचा वेढा

पावसाचा जोर ओसरला… ज्वर पसरला! सर्दी, खोकला आणि तापाच्या साथीचा वेढा

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाला सुरू झाली. रविवार आणि सोमवारी पावसाने मुंबईत अक्षरशः धुमशान घातले. आज पावसाचा जोर ओसरला. परंतु, ज्वर पसरल्याचे चित्र आहे. मुंबईकर सर्दी , खोकला आणि तापाच्या साथीच्या वेढय़ात सापडले आहेत. दवाखान्यांमध्ये, रुग्णालयांच्या ओपीडीत मलेरिया, डेंग्यू, कावीळ, टायफॉईडच्या रुग्णांची गर्दी पावसाला सुरुवात झाल्यापासून दिसू लागल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

वादळी वाऱयासह आलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत किंग्ज सर्कल, दादर टीटी, परळ, मस्जिद बंदर, वरळी, अंधेरी, जोगेश्वरी कांदिवली, मालाड, बोरिवली, वरळीतील आचार्य अत्रे चौक येथे मोठय़ा प्रमाणावर पाणी भरले. गुडघाभर पाण्यातून चाकरमान्यांना वाट काढत रेल्वे स्थानके गाठावी लागली. सगळीकडे चिखलाचे आणि घाणीचे साम्राज्य पसरले. लोकांच्या घरात गटाराचे पाणी गेले. हे पाणी आता ओसरले असले तरी साथीचे आजार मोठय़ा प्रमाणावर पसरण्याची शक्यता असल्याची माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

दिवसाला 90 ते 100 रुग्ण

गेल्या काही दिवसांपासून मुबंईसह उपनगरात ढगाळ वातावरण आणि रात्री मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे दवाखान्यात येणाऱया तापांच्या रुग्णांचे प्रमाण प्रचंड आहे. दिवसाला तब्बल 90 ते 100 रुग्ण दवाखान्यात येत आहेत, अशी माहिती कांदिवली येथील फॅमिली फिजीशियन डॉ. संजीव कुदळे यांनी दिली.अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य असल्याने आणि वातावरण अजूनही ढगाळच असल्याने तापाच्या रुग्णांची संख्या वाढू शकते, असे डॉ. कुदळे यांनी सांगितले.

लहान मुलांना सांभाळा

विविध ठिकाणी सखल भागात, झोपडपट्टय़ांमध्ये, चाळींमध्ये गटाराचे पाणी शिरले. अनेक ठिकाणी अजूनही चिखल आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांना सर्वाधिक सर्दी, खोकला, तापाचा संसर्ग होऊ शकतो. तापाची लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. डेंग्यू, मलेरिया, कावीळ अशा आजारांचा संसर्गही लहान मुलांना होऊ शकतो, अशी माहिती वाडिया रुग्णालयाच्या डॉ. मिनी बोधनवाला यांनी दिली.

40 टक्के रुग्ण तापाचे

रुग्णालयाच्या ओपीडीत सध्या 40 टक्के रुग्ण सर्दी, खोकला आणि तापाचे येत आहेत. पुढच्या दोन दिवसात यात आणखी वाढ होईल अशी माहिती जे जे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संजय सुरासे यांनी दिली. तर अनेक रुग्णालयात सध्या 25 ते 30 टक्के रुग्ण सर्दी, तापाचे येत आहेत. पुढील दोन दिवसात ही संख्या आणखी वाढू शकते अशी माहिती, नायर रुग्णालयातील कान, नाक आणि घसा शस्त्रक्रिया विभागाच्या विभागप्रमुख डॉ. बची हाथीराम यांनी दिली.

वरळीतील मेट्रो स्थानक अनिश्चित काळासाठी बंद

मुंबई पहिल्याच पावसाच्या तडाख्याने खड्डय़ात गेली असून रस्त्यांवर मुंबईकरांना जणू चंद्रसफरच घडत आहे. दुसरीकडे सोमवारी पाण्यात बुडालेले वरळीतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

काजोल – राणी मुखर्जी यांच्या जवळतच्या व्यक्तीचं निधन, अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींची गर्दी काजोल – राणी मुखर्जी यांच्या जवळतच्या व्यक्तीचं निधन, अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींची गर्दी
अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांचा भाऊ अयान मुखर्जी याचे वडील देब मुखर्जी यांच्या निधनानंतर कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचं निधन...
वकिलावरच केस फाईल करण्याची वेळ आलीय!; वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावर प्रश्न विचारताच अभिनेता संतापला
त्याचं स्तनपान सुटलं..; लिव्हर कॅन्सरशी झुंज देणारी दीपिका मुलाबद्दल बोलताना झाली भावूक
डोळ्यांतून वारंवार पाणी येणं नक्की कोणत्या आजाराचं लक्षण, बिलकूल दुर्लक्ष करू नका
OMAD आहार म्हणजे काय? जाणून घ्या याचे आरोग्यासाठी होणारे फायदे आणि दुष्परिणाम
पीरियडसच्या काळात अशी काळजी घ्या, नाही तर… एक्सपर्टचा विशेष सल्ला काय?
रक्त न काढता करा रक्त तपासणी, AI तंत्रज्ञानामुळे क्रांतिकारी बदल