दररोज 3000 लोकांना अटक करा, ट्रम्प प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आदेश; काय आहे कारण?

दररोज 3000 लोकांना अटक करा, ट्रम्प प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आदेश; काय आहे कारण?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बेकायदा स्थलांतरितांविरोधात कठोर कारवाईचा पवित्रा घेतला आहे. अमेरिकन न्यूज वेबसाइट अ‍ॅक्सिओसच्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासनाने इमिग्रेशन अँड कस्टम्स एनफोर्समेंट (ICE) अधिकाऱ्यांना दररोज 3000 बेकायदा स्थलांतरितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. हा आकडा ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या काळात केल्या जाणाऱ्या अटकांच्या तुलनेत तिप्पट आहे.

ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ सल्लागार स्टीफन मिलर आणि गृहसुरक्षा सचिव क्रिस्टी नोम यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत आयसीई अधिकाऱ्यांना हे नवे लक्ष्य साध्य करण्यास सांगितले. वृत्तानुसार, सीमावर्ती भागातील स्थलांतरितांचे प्रमाण कमी झाले असले तरी, देशांतर्गत गैर-सीमावर्ती समुदायांमध्ये अटकेची कारवाई तीव्र करण्यात येत आहे. यामुळे बेकायदा स्थलांतरितांना देशातून बाहेर काढण्याच्या ट्रम्प यांच्या धोरणाला गती मिळणार आहे.

दरम्यान, या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील स्थलांतरित समुदायांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच या कारवाईला कायदेशीर आव्हाने मिळण्याची शक्यता आहे. कारण ट्रम्प यांनी यापूर्वी घेतलेल्या अनेक स्थलांतरविरोधी निर्णयांना न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;