काजोल – राणी मुखर्जी यांच्या जवळतच्या व्यक्तीचं निधन, अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींची गर्दी

काजोल – राणी मुखर्जी यांच्या जवळतच्या व्यक्तीचं निधन, अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींची गर्दी

अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांचा भाऊ अयान मुखर्जी याचे वडील देब मुखर्जी यांच्या निधनानंतर कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचं निधन झालं आहे. ज्यामुळे मुखर्जी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुखर्जी कुटुंबातील देब मुखर्जी यांच्यानंतर रोनो मुखर्जी यांचं निधन झालं आहे. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. बुधवारी रोनो मुखर्जी यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनाची माहिती कळताच मुखर्जी कुटुंबातील इतर सदस्य, दिग्दर्शक अशुतोष गोवारिकर आणि अन्य सेलिब्रिटी अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.

कोण होते रोनो मुखर्जी?

रोनो मुखर्जी हे अभिनेत्री शरबानी मुखर्जी यांचे वडील होतो. रोनो मुखर्जी यांनी ‘बॉर्डर’, ‘मोहनदास’ आणि ‘गॉड ओनली’ दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. रोनो मुखर्जी अनुभवी दिग्दर्शक देखील होती. त्यांनी दोन सिनेमांचं दिग्दर्शन देखील केलं. ‘तू ही मेरी जिंदगी’ आणि ‘हैवान’ या दोन सिनेमांमध्ये रोनो मुखर्जी यांनी दिग्दर्शन केलं आहे.

1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि रोनो मुखर्जी दिग्दर्शित ‘तू ही मेरी जिंदगी’ सिनेमामध्ये त्यांचा भाऊ देब मुखर्जी, निवेदिता, लिबी राणा, सलोम रॉय कपूर, एम.बी. शेट्टी, गजानन जहागीरदार हे मुख्य भूमिकेत होते. सिनेमाला चाहत्यांनी देखील भरभरुन प्रेम दिलं.

रोनो मुखर्जी यांचा दुसरा दिग्दर्शित सिनेमा ‘हैवान’ 1977 मध्ये प्रदर्शित झाला. या थ्रिलर सिनेमामध्ये त्यांचा भाऊ लक्ष्मी छाया, माणिक दत्त, पद्मा खन्ना, देब मुखर्जी, प्रेमा नारायण आणि नाजनीन यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. याशिवाय त्यांचा भाऊ जॉय मुखर्जी यांनीही यात विशेष भूमिका साकारली होती.

रोनो मुखर्जी यांचं कुटुंब

रोनो मुखर्जी यांचं कुटुंब झगमगत्या विश्वापासून दूर साधारण आयुष्य जगतं. पण भारतीय सिनेमातील त्यांचं योगदार नाकारता येणार नाही. मुखर्जी कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. मुखर्जी कुटुंबाने अनेक कलाकार बॉलिवूडला दिले आहेत.

काजोल, राणी मुखर्जी, तनिषा मुखर्जी आणि फिल्म मेकर अयान मुखर्जी यांसारखे अनेक कलाकार मुखर्जी कुटुंबाने बॉलिवूडला दिले आहे. सध्या मुखर्जी कुटुंबावार दुःखाचं डोंगर कोसळलं असून बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;