त्याचं स्तनपान सुटलं..; लिव्हर कॅन्सरशी झुंज देणारी दीपिका मुलाबद्दल बोलताना झाली भावूक

त्याचं स्तनपान सुटलं..; लिव्हर कॅन्सरशी झुंज देणारी दीपिका मुलाबद्दल बोलताना झाली भावूक

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या तिच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाचा सामना करतेय. काही दिवसांपूर्वी दीपिकाच्या लिव्हरमध्ये ट्युमर असल्याचं निदान झालं होतं. आता ते ट्युमर कॅन्सरचं असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. दीपिकाला स्टेज 2 लिव्हर कॅन्सर असून आरोग्याशी संबंधित इतरही समस्यांचा ती सामना करतेय. सोशल मीडिया आणि युट्यूब व्लॉगच्या माध्यमातून दीपिका आणि तिचा पती शोएब इब्राहिम हे सतत चाहत्यांना अपडेट्स देत आहेत. नुकत्याच एका व्लॉगमध्ये ते त्यांच्या चिमुकल्या मुलाविषयी बोलताना भावूक झाले. दीपिका आणि शोएब यांना एक वर्षाचा मुलगा असून त्याचं नाव रुहान असं आहे.

कधी होणार दीपिकाची सर्जरी?

या व्लॉगच्या सुरुवातीलाच शोएबने दीपिकाच्या आरोग्याविषयी अपडेट दिली. “दीपिकाच्या लिव्हरमध्ये टेनिस बॉलच्या आकाराचा ट्युमर असल्याचं आम्ही आधी म्हटलं होतं. परंतु आता समजलंय की तिला स्टेज 2 चा लिव्हर कॅन्सर झाला आहे. अद्याप तिची सर्जरी झाली नाही. कारण तिला ताप आणि कफ होता. डॉक्टरांनी तिला पुढच्या आठवड्यात बोलावलं आहे”, असं शोएबने सांगितलं. यावेळी दीपिका भावूक झाली. ती म्हणाली, “कॅन्सरचं नाव ऐकताच मी खूप घाबरले होते. पण त्यातून मी बाहेर पडेन याची मला आता खात्री आहे. डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की मी पूर्णपणे बरी होऊ शकते. कारण योग्य वेळी त्याचं निदान झालं आहे.”

मुलाबद्दल बोलताना दीपिका भावूक

मुलाबद्दल आधी शोएब सांगतो की, “रुहान आता खूपच समजूतदार झाला आहे. त्याला हळूहळू समजतंय की आईसोबत काहीतरी ठीक नाही. त्याचं फीडिंगसुद्धा सुटलं आहे.” यानंतर दीपिका पुढे म्हणते, “त्याला आता समजलंय की मम्मी ठीक नाही. सुरुवातीला तो एकदा-दोनदा माझ्याजवळ आला, पण आता त्याला समजलं आहे की मला बरं नाही. कुटुंबातील सर्वजण या काळात माझी खूप साथ देत आहेत. आम्ही सर्वजण स्ट्राँग राहण्याचा प्रयत्न करतोय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Dipika (@ms.dipika)

प्रत्येकजण कधी ना कधी आयुष्यातील कठीण काळाचा सामना करतो. आमच्यासाठी हा टप्पा आयुष्यातील सर्वांत कठीण आहे, अशा शब्दांत शोएब व्यक्त झाला. “डॉक्टरांनी पूर्ण आत्मविश्वासाने सांगितलं आहे की मी पूर्णपणे ठीक होईन. डॉक्टर इतके कॉन्फिडंट आहेत, त्यामुळे आमचाही आत्मविश्वास वाढला आहे”, असं दीपिकाने या व्लॉगमध्ये सांगितलंय.

दीपिका पुढे कॅन्सरविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “कॅन्सर हा शब्द प्रत्येकासाठी खूप भीतीदायक, घाबरवणारा असतो. हा आजार मानसिकदृष्ट्या खूप घाबरवतो. परंतु डॉक्टरांनी सांगितलं आहे की मी पूर्णपणे बरी होऊ शकते. मला गॉल ब्लॅडरमधील स्टोनमुळे पोटात सतत दुखायचं. जेव्हा उपचारांनीही हे दुखणं बरं झालं नाही तेव्हा आम्ही सिटी स्कॅन केलं. त्यात ट्युमर असल्याचं निदान झालं होतं. नंतर समजलं की तो कॅन्सरचा ट्युमर आहे. ही देवाच्या परीक्षेची वेळ आहे, पण यातूनही आम्ही लवकरच बाहेर पडू”, असा विश्वास तिने व्यक्त केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;