गुन्हे वृत्त – चालकाला बोनेटवर बसवून नेले

गुन्हे वृत्त – चालकाला बोनेटवर बसवून नेले

मंगळवारी रात्री विलेपार्ले येथे दोन वाहन चालकांमध्ये वाद झाला. त्यानंतर एर्टिगाच्या चालकाने रागाच्या भरात त्याच्या कार समोर उभ्या असलेल्या दुसऱया व्यक्तीला चिरडण्याचा प्रयत्न केला. स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याने कारच्या बोनेटवर उडी मारली. चालकाने गाडीचा वेग कमी करण्याऐवजी त्याला बोनेटवर बसवून काही मीटर अंतरापर्यंत नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

गोरेगाव येथे तरुणीची आत्महत्या

इमारतीच्या 45 व्या मजल्यावरून उडी मारून तरुणीने जीवन संपवल्याची घटना गोरेगाव येथे घडली. ती तरुणी गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात होती. याप्रकरणी आरे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली. मृत तरुणी ही गोरेगाव येथे एका उच्चभ्रू सोसायटीत राहत असून ती वांद्रय़ातील महाविद्यालयात शिकत होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;