मी निवड समितीचा सदस्य नव्हे, श्रेयस अय्यरबाबत गंभीर विधान

मी निवड समितीचा सदस्य नव्हे, श्रेयस अय्यरबाबत गंभीर विधान

इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रेयस अय्यरची निवड करणे आवश्यक असतानाही त्याला डावलण्यात आले आहे. श्रेयसवर अन्याय झाल्याची सर्वाची भावना असली तरी त्याच्यासाठी अद्याप कुणीही उभा राहिलेला नाही. त्याच्या निवडीबाबत हिंदुस्थानी संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला छेडले असता तो म्हणाला, मी निवड समिती सदस्य नाही, अशा एका वाक्यात त्याने उत्तर देणे टाळले. गेली दीड वर्ष संघात आतबाहेर होत असलेल्या अय्यरने गेल्या वर्षी कोलकात्याला आयपीएल जेतेपद जिंकून दिले होते तर या वर्षी पंजाबकडून खेळताना तो पुन्हा त्याच पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याच्या दिशेने पावले टाकतोय. श्रेयस हा यंदाच्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार-फलंदाज आहे. त्याच्या खालोखाल गुजरातच्या शुभमन गिलचे नाव असले तरी त्याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;