शिवसेनेने मुसळधार पावसातही विद्यार्थी-पालकांसाठी घेतले विशेष दाखले शिबीर; शेकडो विद्यार्थ्यांना लाभ

शिवसेनेने मुसळधार पावसातही विद्यार्थी-पालकांसाठी घेतले विशेष दाखले शिबीर; शेकडो विद्यार्थ्यांना लाभ

शिवसेना नेते, दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांच्या माध्यमातून शिवसेना विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या प्रयत्नातून व नेतृत्वाखाली मुलुंड तहसीलदार कार्यालय कुर्ला विभागाच्या सहकार्याने अणुशक्तीनगर व चेंबूर येथे सलग तीन दिवस विद्यार्थी आणि पालकासाठी विशेष दाखले शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुसळधार पावसातही शिवसैनिकांनी यशस्वीपणे या शिबिराचे आयोजन पेले. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता आला.

मुलुंड तहसीलदार यांच्या वतीने सलग तीन दिवस तलाठी व सेवा केंद्राच्या कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली होती. माजी नगरसेविका व विधानसभा प्रमुख निधी शिंदे, विधानसभा संघटक महेंद्र नाकटे, शाखाप्रमुख विजय भोईर, अविनाश शेवाळे यांनी आपल्या सहकारी पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या सहकार्याने शिबीर यशस्वी करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. खासदार प्रतिनिधी विजय सागवेकर व रूपेश मढवी यांनी समन्वय साधला. शाखाप्रमुख किरण म्हात्रे, गणेश पाटील, सचिन भोसले, अशोक वीर, उमेश करकेरा, संदीप वेताळे, मनोहर नायडू, राजेश दौंडकर, विशाल उगले, महिला शाखा संघटक दक्षता पाताडे, दुर्गा ढगे, अक्षता विचारे, मनीषा मोकल, मंदा फुले यांनी नागरिकांना सहकार्य केले. माजी आमदार प्रकाश फातर्पेकर, महिला विभाग संघटक पद्मावती शिंदे, विधानसभा प्रमुख रुक्मिणी भोसले, विधानसभा संघटक नीलम डोळस, उपविभागप्रमुख किरण लोहार, अमित शिंदे, प्रशांत म्हात्रे, संजय मोरे, आनंद नलावडे, चारुदत्त कोळी, अमोल कोकरे, दीपेश चव्हाण, वैभव जाधव, रूपेश गावकर, सुनील मोहोळकर, राकेश बनसोडे, विकास भोसले, प्रमोद कोकमकर, रोहिणी नाकटे, छाया साळुंखे, रेखा पाटकर, अनिता मोरे उपस्थित होते.

n विद्यार्थ्यांना महाविद्यालयात तर बरोबर सर्वसामान्यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक दाखले लागतात. एकाच छताखाली एकाच वेळी उत्पन्नाचा दाखला, राष्ट्रीय अधिवास दाखला, स्थानिक वास्तव्याचा दाखला आणि ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ही महत्त्वाची सरकारी कागदपत्रे मिळावीत यासाठी विशेष दाखले शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल