OMAD आहार म्हणजे काय? जाणून घ्या याचे आरोग्यासाठी होणारे फायदे आणि दुष्परिणाम
आजकाल प्रत्येकजण वाढत्या वजनाने त्रस्त झालेले आहेत. वजन नियंत्रित करण्यासाठी तुमच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष देणे खुप महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही ट्रेनर कडे जाता तेव्हा ते तुम्हाला व्यायामासोबत योग्य डाएट फॉलो करायला सांगतात. आजकाल जलदपणे वजन कमी करण्यासाठी कमी कार्ब डाएट, केटो, लिक्विड डाएट, अधूनमधून उपवास यासारख्या अनेक प्रकारच्या डाएटचा ट्रेंड आहे. यापैकी एक म्हणजे OMAD डाएट. हा डाएट तुमचे वजन जलदरित्या कमी करण्यास मदत करतात. परंतु तुमच्या दिनचर्येत हा डाएट फॉलो करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.
जेव्हा वजन कमी करण्याचा विचार येतो तेव्हा लोकं कोणत्या प्रकारचा डाएट सुरू करावा या संभ्रमात असतात. तर आजच्या या लेखात आपण OMAD डाएटबद्दल जाणून घेऊ, ज्याचे पालन करून आपण वजन कमी करू शकतो. मात्र प्रथम तुम्हाला OMAD आहार म्हणजे काय आणि तो फॉलो करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेणे आवश्यक आहे.
OMAD डाएट म्हणजे काय?
OMAD डाएट म्हणजे दिवसभरात तुमच्या आहारात फक्त एक वेळेचे जेवण समाविष्ट करणे. या डाएटमध्ये तुम्ही पूर्ण 24 तासांमध्ये दिवसातून फक्त एकदा एका तासात अन्न सेवन करायचे असते. मग तुम्ही या डाएटचे नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण यादरम्यान केव्हाही करू शकता. पण लक्षात ठेवा की तुम्ही दिवसातून फक्त एकदाच अन्न खाऊ शकता. उर्वरित 23 तास तुम्ही काहीही खाऊ नये. अन्यथा या डाएटचे पालन केल्याने तुमच्या शरीरावर कोणताही परिणाम होणार नाही.
OMAD डाएट चे फायदे
जलद वजन कमी होणे
OMAD डाएट फॉलो केल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होते. कारण जेव्हा तुम्ही हा डाएट पाळता तेव्हा तुम्ही दिवसातून फक्त एकदाच जेवता, ज्यामुळे वजन खूप सहज कमी करता येते. कारण तुमचे कॅलरीजचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
लक्ष केंद्रित करते
OMAD डाएट फॉलो केल्याने तुमचे लक्ष केंद्रित होते कारण या डाएटमध्ये तुम्ही संपूर्ण 23 तास उपवास करता, म्हणजेच तुम्ही 23 तास काहीही खात नाही. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे लक्ष केंद्रित होण्यासही मदत होते. तुम्ही तुमचे काम काळजीपूर्वक पूर्ण करू शकाल.
आहार बाबत कोणतीही चिंता नाही
OMAD डाएट फक्त एकाच वेळी आहार घेतले जाते, त्यामुळे या डाएटचे पालन करणे सोपे आहे, कारण कॅलरीजची आणि प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी वारंवार वेगवेगळे जेवण घेण्याचा त्रास होत नाही.
OMAD आहाराचे दुष्परिणाम
जास्त खाणे होऊ शकते
दिवसातून फक्त एकदाच जेवण करता. त्यामुळे तुम्हाला काही वेळाने भुक लागते. अशातच तुम्ही जेव्हा OMAD डाएट फॉलो करता तेव्हा आहाराच्या वेळी अति खाण्याचे बळी होऊ शकता, कारण दिवसाचे 23 तास काहीही न खाता राहणे हे ऐकायला जितके वेगळे आणि कठीण वाटते तितकेच फॉलो करणे सोपे नाही. तुम्ही २३ तासांच्या दरम्यान काही अस्वास्थ्यकर स्नॅक्स खाता. अशा परिस्थितीत तुम्ही जास्त खाण्यास सुरुवात करता, ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्याऐवजी आणखी वाढू शकते.
अशक्तपणा जाणवणे
OMAD डाएट तुम्ही जेव्हा फॉलो करता तेव्हा दिवसाचे 22-23 तास उपवास करता ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा, थकवा किंवा चक्कर येऊ शकते. जेव्हा तुम्हाला वजन कमी करण्याची तीव्र गरज असेल तेव्हाच हा आहार घ्या.
चिडचिड होऊ शकते
OMAD डाएट फॉलो करताना तुम्हाला 23 तास काहीही न खाल्ल्याने तुमची चिडचिड होऊ शकते, त्यामुळे पुरेसे अन्न न खाल्ल्याने तुमच्या मूडवरही परिणाम होऊ शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List