शिवसेनेच्या रणरागिणींकडून हगवणेच्या घरावर शेण टाकून निषेध
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे याच्या मुळशी तालुक्यातील भुकूम गावातील घरावर शेण टाकून शिवसेना पिंपरी-चिंचवड महिला आघाडीच्या रणरागिणींनी आज निषेध आंदोलन केले. हगवणे कुटुंबाविरोधात घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. महिला आघाडीच्या शहर संघटिका रूपाली आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये शहर उपसंघटिका ज्योती भालके, पिंपरी विधानसभा समन्वयक सुषमा शेलार, विभागप्रमुख साधना काशिद, नंदा दातकर, करुणा भुजबळ, वंदना वाल्हेकर, तस्लीम शेख, आरती साठे, दीपक भक्त, अनिता तळेकर उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List