मायक्रोसॉफ्ट 6800 कर्मचाऱ्यांना काढणार
अमेरिकेची मायक्रोसॉफ्ट कंपनी आपल्या जगभरातील शाखांमधून विविध विभागांमधून 6 हजार 800 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करणार आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 3 टक्के इतकी आहे. जगभरात कंपनी अधिक सक्षम करण्यासाठी तसेच एआय आणि क्लाऊड कॉम्प्युटिंगमधील गुंतवणूक वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे कंपनीच्या प्रतिनिधीने स्पष्ट पेले आहे. मायक्रोसॉफ्टने आधीही व्यवस्थापकीय आणि अंतर्गत यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. जानेवारी 2023 मध्ये सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List