19 वर्षांच्या पोरानं दाखवला हिसका! पदार्पणातच 61 वर्षांपूर्वीचा विक्रम काढला मोडीत

19 वर्षांच्या पोरानं दाखवला हिसका! पदार्पणातच 61 वर्षांपूर्वीचा विक्रम काढला मोडीत

वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे, प्रियांश आर्य यांसारख्या हिंदुस्थानच्या यंग ब्रिगेडने IPL मध्ये धुवाधार फटकेबाजी करत जगभरात आपल्या नावाचा डंका वाजवला. आता अशाच एका दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षीय खेळाडूने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतकीय पारी खेळत सर्वांनाच आश्चर्याचा सु:खद धक्का दिला आहे. या शतकासोबतच त्याने 61 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वे दौरा सुरू असून उभय संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा 19 वर्षीय खेळाडू लुआन-ड्रे प्रीटोरियस याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या सामन्यात त्याने 112 चेंडूंचा सामना करत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपलं पहिलं शतक पूर्ण केलं. याचसोबत तो आता दक्षिण आफ्रिकेकडून शतक ठोकणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम ग्रीम पोलॉक याच्या नावावर होता. त्याने 1964 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात 19 वर्ष 317 दिवसांचा असताना शतक ठोकले होते. तर आता लुआन-ड्रे प्रीटोरियसने 19 वर्ष आणि 93 दिवसांमध्येच शतक ठोकण्याची कामगिरी केली आहे. त्याने 160 चेंडूंचा सामना करत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 153 धावांची खेळी केली.

विंडीजच्या स्टार क्रिकेटपटूवर बलात्काराचा आरोप, गयानातील 11 पीडित महिला आल्या समोर

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;