Pune News – हिडन मोबाईल अ‍ॅपद्वारे भक्तांच्या खासगी आयुष्यावर नजर, पुण्यात भोंदूबाबाचा पर्दाफाश

Pune News – हिडन मोबाईल अ‍ॅपद्वारे भक्तांच्या खासगी आयुष्यावर नजर, पुण्यात भोंदूबाबाचा पर्दाफाश

हिडन मोबाईल अ‍ॅपद्वारे भक्तांच्या खासगी आयुष्यावर नजर ठेवणाऱ्या भोंदूबाबाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बावधन पोलिसांनी या भोंदूबाबाला अटक केली आहे. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. आपल्याकडे दिव्यशक्ती असल्याचे भासवत तो भक्तांची फसवणूक करत होता. एका भक्ताने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत बाबाला बेड्या ठोकल्या.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, भोंदूबाबाने त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याचे सांगितले. यानंतर फिर्यादीच्या मोबाईलमध्ये एक हिडन अ‍ॅप डाऊनलोड करत त्याद्वारे मोबाईलचा अ‍ॅक्सेस मिळवला. या अ‍ॅपद्वारे तो फिर्यादी आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांवर लक्ष ठेवायचा. याशिवाय या भोंदूबाबाने फिर्यादीला अश्लील कृत्य आणि वेश्यागमन करण्यास भाग पाडत ते मोबाईल अ‍ॅपद्वारे पाहिले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच या भोंदूबाबाने फिर्यादीसह अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचेही पोलिसांनी सांगितले.

सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपी भोंदूबाबाचा मोबाईल आणि हिडन अ‍ॅपची कसून तपासणी सुरू आहे. हिडन अ‍ॅपद्वारे केलेले भक्तांचे चित्रीकरण कुठे ठेवले जात होते, याबाबत डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू आहे. बाबाने फसवणूक केली असल्यास न घाबरता तक्रार द्यायला पुढे येण्याचे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Mumbai News – खोकल्याचे सिरप समजून कपडे धुण्याच्या केमिकलचे सेवन केले, लाँड्रिचालकाचा मृत्यू

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;