ही शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला आम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठी कधीच संपवू देणार नाही; उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले

ही शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला आम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठी कधीच संपवू देणार नाही; उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले

ही शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला इकडे आम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठी कधीच संपवू देणार नाही. मराठीला आम्ही धक्का तुम्हाला लावायला देणार नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपला ठणकावले. मुंबईतील वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार हारुन खान यांच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळ्यावेळी उद्धव ठाकरे हिंदी सक्तीवरून भाजपला इशारा दिला.

मी इथे भाषण करायला आलेलो नाही. मनापासून सांगतोय तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायला आलेलो आहे. याचं कारण तुम्ही आमदार निवडून आणला. अजूनही गेल्या विधानसभेच्या निकालावर चर्चा चरवण सुरू आहे. निकाल कसा लागला, का लागला? पण या वर्सोवाने दाखवून दिलं की कोणी कितीही आदळआपट केली तरी शिवसेनेचा भगवा इथे कोणी हरवू शकत नाही. आणि मनापासून याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतोय. एकदा निर्णय घेतल्यानंतर सगळ्यांनी झटून मेहनत केली. आणि हा वॉर्ड आपण खेचून आणला, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

अ‍ॅडमिशन देताय की मंत्रिपदं देताय? अकरावी प्रवेशावरून आदित्य ठाकरे यांनी शिक्षणमंत्र्यांविरोधात आंदोलनाचा इशारा देताच पहिली यादी जाहीर

उद्या एक कार्यक्रम मी तुम्हाला दिलेलाच आहे आणि अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. कारण आपण कोणत्याही भाषेचा द्वेष कधीच केलेला नाही. इथेही इतर भाषिक आले असतील. हिंदी भाषिक, गुजराती भाषिक असतील. आणखी इतरही कोणी असतील. आपला भाषेला विरोध नाही पण आपल्यावर जी सक्ती केली जातेय त्या सक्तीला आपण विरोध करतोय. आणि आता या भाजपला असं वाटतंय की मराठी माणसाची एकजूट आता राहिलेली नाही, फुटलेली आहे. आता आपल्याला इकडे कोणी अडवू शकत नाही. त्यांना मला सांगायचं की, तुम्ही जे काय मांडीवर घेऊन बसलायेत ती शिवसेना नाहीये, खरी शिवसेना इकडे आहे. आणि ही शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला इकडे आम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठी कधीच संपवू देणार नाही. मराठीला आम्ही धक्का तुम्हाला लावायला देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपला ठणकावले. उद्याचं आंदोलन आहे. त्यानंतर ५ तारखेला मोर्चा सुद्धा आहे. तुमची ही एकजूट अशीच कायम ठेवा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;