Mumbai News – वरळीतील लोटस जेट्टीवर अस्थि विसर्जनादरम्यान समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू, एक जण जखमी

Mumbai News – वरळीतील लोटस जेट्टीवर अस्थि विसर्जनादरम्यान समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू, एक जण जखमी

वरळीतील लोटस जेट्टी येथे शनिवारी अस्थिविसर्जन करताना दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. स्थानिक मच्छिमार आणि पोलिसंनी तात्काळ तिघांचा शोध सुरू केला. संतोष विश्वेश्वर (51), कुणाल कोकाटे (45) अशी मयत दोघांची नावे आहेत. तर संजय सरवणकर (58) असे जखमीचे नाव आहे.

हाजिअलीजवळील वरळी येथील लोटस जेट्टी येथे शनिवारी अस्थिवसर्जनाचा विधी सुरू असताना लाटांच्या प्रवाहासोबत तिघे वाहून गेले. सायंकाळी 5.40 वाजता समुद्रात तीन जण बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने तिघांना पाण्यातून बाहेर काढले. तिघांनाही नायर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. तर जखमीची प्रकृती आता स्थिर आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;