Mumbai News – अखेर अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; विद्यार्थ्यांना 7 जुलैपर्यंत घ्यावा लागणार प्रवेश

Mumbai News – अखेर अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; विद्यार्थ्यांना 7 जुलैपर्यंत घ्यावा लागणार प्रवेश

दहावीचा निकाल जाहीर होऊन जवळपास दीड महिना उलटल्यानंतर अखेर अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली आहे. विद्यार्थी आणि पालकांना ही यादी https://mahafyjcadmissions.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे. यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना 30 जून ते 7 जुलैपर्यंत संबंधित कॉलेजमध्ये आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

अकरावी प्रवेशाचा यंदाही गोंधळ सुरु राहिला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप झाला आहे. अशा स्थितीत पहिल्या यादीसाठी 30 जूनची तारीख जाहीर केली होती. त्याच्या दोन दिवस आधी, शनिवारी पहिली यादी जाहीर करुन शिक्षण संचालनालयाने विद्यार्थी आणि पालकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्याचा दहावीचा निकाल 13 मे रोजी जाहीर करण्यात आला. मात्र निकाल लागून जवळपास दीड महिना झाला तरी अद्याप विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश झाले नाही. यंदा एकूण 12 लाख 71 हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;