Thane News – इमारतीच्या 13व्या मजल्यावरून मजूर कोसळला, बदलापुरातील धक्कदायक घटना

Thane News – इमारतीच्या 13व्या मजल्यावरून मजूर कोसळला, बदलापुरातील धक्कदायक घटना

निर्माणाधीन इमारतीच्या 13व्या मजल्यावरून पडून एक मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना बदलापुरात शनिवारी घडली. मोहन विलोज या निर्माणाधीन इमारतीत ही घटना घडली. प्रमोद रामलाल खडीया असे मयत मजुराचे नाव आहे. प्रमोद मूळचा छत्तीसगडचा असून तो पत्नीसह या इमारतीत काम करत होता. या प्रकरणी बदलापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

बदलापुरातील सुरवळ चौकातील इमारतीत शनिवारी दुपारच्या सुमारास काम करत असताना प्रमोद 13 व्या मजल्यावरून खाली कोसळला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ बदलापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इमारतीच्या ठिकाणी संरक्षक जाळ्या न लावल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;