नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केला, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कार्तिक महाराजांवर महिलेने केला गंभीर आरोप

नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केला, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कार्तिक महाराजांवर महिलेने केला गंभीर आरोप

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भारत सेवाश्रम संघाशी संबंधित कार्तिक महाराजांवर एका महिलेने अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नबग्राम पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आली आहे.

महिलेने मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, 2013 साली मुर्शिदाबादच्या एका आश्रमामध्ये प्राथमिक विद्यालयात या महिलेला कार्तिक महाराजांनी शिक्षिकेची नोकरी दिली होती. तसेच आश्रम परिसरात राहण्यासाठी एक खोली सुद्धा दिली होती. याच दरम्यान एक दिवशी रात्री अचानक कार्तिक महाराज महिलेच्या खोलीमध्ये आले आणि त्यांनी शारीरीक संबंध प्रस्थापित करण्याची मागणी केली. परंतु जेव्हा महिलेने विरोध केला तेव्हा तिच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला आणि भीती दाखवून संबंध प्रस्थापित केले, असा दावा महिलेने केला आहे. मात्र, कार्तिक महाराजांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आज तक वृत्तवाहिणीने यासदंर्भात वृत्त दिले आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली नबग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;