Mumbai News – परदेशी सापांच्या तस्करीचा पर्दाफाश, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकाला अटक

Mumbai News – परदेशी सापांच्या तस्करीचा पर्दाफाश, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकाला अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी सापांच्या तस्करीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी एअर इंटेलिजेंस युनिटच्या अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. गुडमन लिनफोर्ड लिओ असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून तस्करीसाठी आणलेले साप हस्तगत करण्यात आले आहेत.

गुडमन लिनफोर्ड लिओ हा शुक्रवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. तो ग्रीन चॅनेलमधून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच अधिकाऱ्यांना त्यांच्यावर संशय आल्याने त्याला थांबवले. त्याच्या सामानाची तपासणी केली असता आत 15 पांढऱ्या कापडी पिशव्या आढळल्या. या पिशव्यांमध्ये परदेशी सापांच्या प्रजाती होत्या.

जप्त केलेल्या प्रजातींमध्ये दोन गार्टर साप (थॅमनोफिस एसपीपी), पाच राईनोसिरोस रॅट स्नेक (गोनियोसोमा बोलेंगेरी), एक अल्बिनो रॅट स्नेक (पँथेरोफिस गुट्टाटस), दोन केनियन सँड बोस (गोंगिलोफिस कोलुब्रिनस), एक कोस्टल बँडेड कॅलिफोर्निया किंग साप (लॅमप्रोपेल्टिस कॅलिफोर्निया) आणि पाच अल्बिनो होंडुरन मिल्क स्नेक (लॅमप्रोपेल्टिस ट्रायअँगुलम होंडुरेंसिस) यांचा समावेश आहे. याप्रकरणी सीमाशुल्क कायदा 1962 च्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे.

प्राथमिक तपासात मोठ्या वन्यजीव तस्करी सिंडिकेटचा सहभाग असल्याचे दिसून येते. आरोपीच्या साथीदारांची माहिती अद्याप मिळाली नाही. अधिकारी आरोपीच्या साथीदारांचा शोध घेण्याचा आणि ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;