Mumbai News – खोकल्याचे सिरप समजून कपडे धुण्याच्या केमिकलचे सेवन केले, लाँड्रिचालकाचा मृत्यू

Mumbai News – खोकल्याचे सिरप समजून कपडे धुण्याच्या केमिकलचे सेवन केले, लाँड्रिचालकाचा मृत्यू

मुंबईतील परळ परिसरात एक धक्कादायक समोर आली आहे. खोकल्याचे औषध समजून कपडे धुण्यासाठी वापरले जाणारे केमिकल प्यायल्याने एका लाँड्रिचालकाचा मृत्यू झाला. संभाजी सज्जई धोबी असे मयत लाँड्रिचालकाचे नाव आहे. याप्रकरणी एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोअर परळ येथील 59 वर्षीय लाँड्रिचालक संभाजी धोबी यांना काही दिवसांपासून खोकला येत होता. यामुळे त्यांनी खोकल्याचे सिरप घेतले. मात्र त्यांनी खोकल्याचे सिरप समजून जुन्या औषधाच्या बाटलीत ठेवलेले कपड्यावरील डाग धुण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल सेवन केले.

केमिकल सेवन केल्यामुळे संभाजी यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ केईएम रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी यांना औषधांच्या आणि इतर घरगुती वस्तूंच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये कपड्यांचे रंग आणि डिटर्जंटसह विविध रसायने साठवण्याची सवय होती. पोलिसांनी बाटली जप्त करत फॉरेन्सिक तपासासाठी पाठवली आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;