तुरुंगात आरोपीला जैन पद्धतीचे जेवण का देत नाही? आर्थर रोड तुरुंगाच्या अधीक्षकांना कोर्टाची नोटीस

तुरुंगात आरोपीला जैन पद्धतीचे जेवण का देत नाही? आर्थर रोड तुरुंगाच्या अधीक्षकांना कोर्टाची नोटीस

आर्थर रोड तुरुंगातील आरोपींना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. तुरुंगात आरोपीला जैन पद्धतीचे जेवण का देत नाही? असा सवाल करीत मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने आर्थर रोड तुरुंगाच्या अधीक्षकांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार अधीक्षकांना आता न्यायालयात स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशानंतरही आपल्याला जेवणात फक्त चपातीच दिली जात आहे, असा दावा आरोपी उद्योजकाच्या वतीने करण्यात आला. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने तुरुंग अधीक्षकांना उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मालेगावशी संबंध असलेल्या मनी लॉण्डरिंग प्रकरणात ईडीने सहा आरोपींना अटक केली होती. त्यात अहमदाबादचा उद्योजक रितेशकुमार शाहचा समावेश आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याला आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तुरुंगात जैन पद्धतीचे जेवण देण्यात यावे, मला माझ्या धार्मिक तत्वांचे पालन करण्याचा मूलभूत हक्क आहे, असा दावा शाहने त्याचे वकील विरल बाबर यांच्यामार्फत केला होता. तो दावा मान्य करीत न्यायालयाने शाहला जैन पद्धतीचे जेवण देण्याचे निर्देश 14 मे रोजी तुरुंग प्रशासनाला दिले होते. त्या निर्देशानंतरही प्रशासन जेवणात फक्त चपाती देत जात असल्याचे वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

तुरुंग प्रशासन आधीच्या निर्देशाचे पालन करीत नसल्याचे पीएमएलए न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने आता थेट आर्थर रोड तुरुंगाच्या अधीक्षकांना नोटीस बजावली आणि तुरुंगात आरोपीला त्याच्या इच्छेनुसार जैन पद्धतीचे जेवण का दिले जात नाही, याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपी शाहला नाशिक मर्चंट को-ऑपरेटीव्ह बॅंकेशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरुन अटक केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;