असं झालं तर…यूपीआयवरून चुकीच्या खात्यात पैसे गेले तर…
1 एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवताना चुकून दुसऱयाच्या खात्यात पैसे गेल्यास घाबरून जावू नका. सर्वात आधी ज्या व्यक्तीला चुकून पैसे पाठवले, त्याच्याशी संपर्क साधा.
2 पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट शेअर करून पैसे मागा. जर पैसे पाठवण्यास नकार दिला, तर टोल फ्री क्रमांक 1800-120-1740 वर तक्रार नोंदवा.
3 तुम्ही जो अॅप वापरात आहात, त्या अॅपच्या कस्टमर केअरशी बोला. तसेच रीतसर तक्रार नोंदवा. या वेळी व्यवहाराचा तपशील द्यायला विसरू नका. बँकेशी संपर्क साधा.
4 नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) कडे सुद्धा तक्रार नोंदवा. तुमचे पैसे परत मिळवण्यासाठी ते मदत करू शकतात.
5 आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, जर चुकीच्या खात्यात पेमेंट झाले, तर तुम्हाला तक्रारीच्या 24 ते 48 तासांत पैसे परत मिळण्याची नियमाप्रमाणे तरतूद आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List