एसटीच्या चाकाखाली चिरडून कॉलेज तरुणीचा मृत्यू

एसटीच्या चाकाखाली चिरडून कॉलेज तरुणीचा मृत्यू

सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर एसटी बसच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सांगली शहरातील जय मातृभूमी व्यायाम मंडळासमोर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

शर्वरी राजकुमार कुलकर्णी (वय 21, रा. हरिपूर, सांगली) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. मयत शर्वरी ही सांगलीतील एका महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत होती. सकाळी शर्वरी नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना सिव्हिल रोडवर मुंबई-जमखंडी बसच्या मागील चाकाखाली सापडून तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर काही अंतरावर जाऊन बस थांबली. घटनेनंतर अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. शर्वरीच्या वडिलांचा मृत्यू झाला असून, आई आणि बहिणीसोबत ती हरिपूर येथे राहात होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;