रेशनच्या 400 पोती तांदळासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त; जामखेड-करमाळा मार्गावर छापा

रेशनच्या 400 पोती तांदळासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त; जामखेड-करमाळा मार्गावर छापा

रेशनिंगचा तांदूळ काळय़ा बाजारात विक्रीसाठी नेणाऱ्या ट्रकवर नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. यावेळी ट्रकमधून 400 गोण्या तांदळासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुंदर बबन घुमरे (वय 60, रा. लोणी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर), योगेश मोहन भंडारी (रा. जामखेड, ता. जामखेड (फरार) यांचा आरोपीमध्ये समावेश आहे.

पोलीस निरीक्षक आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस पथकाने जामखेड-करमाळा मार्गावर सापळा रचून ट्रकवर कारवाई केली. या ट्रकमध्ये पोलिसांना रेशनच्या तांदळाची 400 पोती आढळली. हा तांदूळ काळय़ा बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत होता. यावेळी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. त्याने गुह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी तांदळाची पोती आणि ट्रक, असा 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. चालकाविरोधात जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक अनंत सालगुडे, विश्वास बेरड, बिरप्पा करमल, हृदय घोडके, रोहित मिसाळ व भगवान धुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;