पालिका निवडणुका जिंकायच्याच; शिवसैनिकांनो कामाला लागा! शिवसेना नेते सुभाष देसाई यांचे आवाहन

पालिका निवडणुका जिंकायच्याच; शिवसैनिकांनो कामाला लागा! शिवसेना नेते सुभाष देसाई यांचे आवाहन

महानगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुका जिंकायच्याच या जिद्दीने शिवसैनिकांनो, कामाला लागा असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी केले. शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना विश्वासात घ्या तसेच शिवसेनेने केलेल्या कामांची माहिती द्या असेही देसाई यांनी सांगितले.

मीरा रोड येथील साईबाबा नगरमध्ये शिवसैनिकांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी कोणती काळजी घ्यायची, निवडणुकीची तयारी कशी करायची याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. मतदार याद्या, बुथ, नवीन मतदारांची नोंदणी यासंदर्भातही त्यांनी मोलाची माहिती दिली. या मेळाव्यात शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनीही मार्गदर्शन केले.

मीरा-भाईंदर संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, ओवळा-माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख सुभाष केसरकर, महिला संपर्क संघटक रोशनी गायकवाड, उत्तर भारतीय सेलचे विनय शुक्ला, महिला जिल्हा संघटक नीलम ढवण, स्नेहल कल्सारिया, उपजिल्हा संघटक प्राची पाटील, विधानसभा समन्वयक मनोज मयेकर, धनेश पाटील, ग्राहक संरक्षण कक्षाचे सदानंद घोसाळकर, मोसेझ चिन्नपा, सुप्रिया घोसाळकर, शहरप्रमुख प्रशांत सावंत, दीपक नलावडे, शहर संघटक शिवानी देसाई, श्रेया साळवी, मनीषा भोपळे, कल्पना शिगवण, युवासेनेचे दीपेश गावंड, श्रेयस हडकर, शाखाप्रमुख नरेंद्र उपरकर, अजय तरे, आयुष चव्हाण, गौतम म्हसे, रोहित सपकाळ, बाजीराव दोंद, सुबोध काळसेकर, संदीप तांबे आदी यावेळी उपस्थित होते.

यांनी केला शिवसेनेत प्रवेश
या मेळाव्यात डॉ. प्रमोद महाजन, विशाल पेवेकर, भरत चव्हाण, गौरव देसाई, मोहन सोलंकी, राज यादव, जय सिंह, सलीम सर्विया, हिरेन लवंत्रा, रेहान सय्यद, संजय कांबळे, शैलेश जमागी, स्वप्नील धंतीकर, राहुल मदेशिया यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;