हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! ठाकरे बंधुंचा फोटो ट्विट करत संजय राऊतांची माहिती

हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! ठाकरे बंधुंचा फोटो ट्विट करत संजय राऊतांची माहिती

महाराष्ट्रात हिंदी सक्ती करून भाषिक आणीबाणी लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप सरकार विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. मराठीचा झेंडा हाच अजेंडा… हिंदी सक्तीविरुद्ध सगळे एकत्र! अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची घोषणा केली. 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार आहे. याच संदर्भात आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी एक्सवर एक पोस्ट करत मोठी माहिती दिली.

हे वाचा – मराठीचा झेंडा हाच अजेंडा… हिंदीसक्ती विरुद्ध सगळे एकत्र! ही तर भाषिक आणीबाणी; उद्धव ठाकरे यांचा हल्ला

हे वाचा – राज ठाकरे यांनी दादाचा भुसा केला

संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. ‘महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!’, असे राऊत यांनी म्हटले. यासोबत त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एक फोटोही शेअर केला आहे. याचा अर्थ हिंदी सक्तीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेचा एकत्र मोर्चा निघेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;