संतप्त वाढवणवासीयांचे समुद्रात जलसमाधी आंदोलन, दुसऱ्या दिवशीही पोलीस बळाचा वापर करून बंदराचे सर्वेक्षण

संतप्त वाढवणवासीयांचे समुद्रात जलसमाधी आंदोलन, दुसऱ्या दिवशीही पोलीस बळाचा वापर करून बंदराचे सर्वेक्षण

वाढवणमधील हजारो भुमिपुत्रांनी बुधवारी चोरी छुपके ड्रोन सर्व्हे हाणून पाडल्यानंतर आज दुसऱया दिवशीही पोलीस बळाचा वापर करून बंदराचे सर्व्हेक्षण करण्यासाठी आयटीडीजी या कंपनीचे अधिकारी व कर्मचारी धडकले. ही बाब समजताच ग्रामस्थांनी त्वरीत धाव घेत या सर्व्हेक्षणाला ठाम विरोध दर्शवला. मात्र दंडुकेशाहीच्या जोरावर कंपनीने हा सर्व्हे केला असून अधिकाऱयांना शिव्यांची लाखोली वाहत मनमानीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी थेट वाढवणच्या समुद्रात धाव घेत तब्बल पाच तास जलसमाधी आंदोलन केले.

सर्व नियम, कायदे व न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून आयटीडीजी या कंपनीच्या अधिकाऱयांनी वाढवणमध्ये बुधवारी घुसखोरी करीत ड्रोन सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब समजताच स्थानिक भुमिपुत्र व संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी धाव घेऊन या सर्व्हेक्षणाला ठाम विरोध केला. त्यामुळे अधिकाऱ्यांना हात हलवत परत जावे लागले. मात्र आज प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त सोबत घेऊन अधिकारी सकाळी सहाच्या सुमारास गावात आले आणि त्यांनी पुन्हा सर्व्हेक्षण सुरू केले. त्यामुळे संतापलेल्या भुमिपुत्रांनी बंदरावर धाव घेऊन आपला संताप व्यक्त केला.

ड्रोन सर्केक्षण हे लोकशाहीला धरून नाही. लोकशाहीचा गळा आकडण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करीत आहे. जिल्हाधिकाऱयांनी वाढवणमध्ये स्वतः येऊन स्थानिकांच्या भावना ऐकून घ्याव्यात.- मिलिन राऊत (वाढवण बंदर युवा संघर्ष समिती)

  • सर्व्हेक्षण सुरू असताना आंदोलनकर्त्यांची पोलिसांबरोबर चांगलीच जुंपली. कोणत्याही परिस्थितीत सर्व्हेक्षण होऊ देणार नाही असा निर्धार भुमिपुत्रांनी दिला.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;