मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी शहा आणि त्यांचा एसंशिं गट कोणत्याही थराला जाईल, मात्र…; संजय राऊत यांनी ठणकावले

मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी शहा आणि त्यांचा एसंशिं गट कोणत्याही थराला जाईल, मात्र…; संजय राऊत यांनी ठणकावले

भाजप आणि एसंशिं हे एकच आहेत. एसंशिं हा अमित शहा यांचा पक्ष आहे. मुंबईवर कब्जा मिळवण्याचे अमित शहा यांचे स्वप्न आहे. ते महाराष्ट्रद्रोही आहेत, मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी त्यांनी यावर कब्जा मिळवायचा आहे. त्यासाठी ते कोणत्याही थराला जातील. मात्र, मुंबईवर कब्जा करण्याचे त्यांचे स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ठणकावले.

एसंशिं हा अमित शहा यांचाच पक्ष आहे. एसंशिंचे नेते अमित शहाच आहेत. त्यामुळेच शहा यांना हवे तेच एसंशिं गट करत आहे. तसेच शहा यांना मुंबईवर कब्जा मिळवायचा आहे, त्यासाठी ते आणि त्यांचा एसंशिं गट कोणत्याही थराला जाऊ शकतो. मात्र, आम्ही त्यांना मुंबईवर कब्जा मिळवू देणार नाही, असेही संजय राऊत यांनी ठणकावले. राज्यात महाविकास आघाडी आजही भक्कम असून एकत्रितपणे काम करत आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय असल्याने स्थानिक पातळीवरील नेत्यांची मते जाणून घेत आहे. त्याप्रमाणे पक्षाचे धोरण ठरवण्यात येत आहे. तसेच याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सविस्तर उत्तर देणार आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

पक्षनेत्यांचे वाढदिवस कार्यकर्ते साजरा करत असतात. त्या त्यांच्या भावना असतात. आता शिवसेनेचे कार्यकर्ते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरे यांनाही शुभेच्छा देत असतील तर त्यात गैर काय आहे. महाराष्ट्राची ही पंरपरा आहे. शुभेच्छांच्या होर्डिंगवर अनेक नेत्यांचे फोटो असतात. शुभेच्छा देण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज लागत नाही. त्यामुळे अशा शुभेच्छांमधून माध्यमांनी वेगळा अर्थ काढू नये, असेही संजय राऊत म्हणाले.

लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही महाराष्ट्रात ताकदीने लढलो. मोदी, अमित शहा आणि भाजप यांच्याविरोधात जनमत होते. जनमताची तीच लाट विधानसभा निवडणुकीवेळीही होती. महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार जाणार, असे वातावरण होते. तरीही आम्हाला सत्ता मिळाली नाही, याचे कारण सर्वांना माहिती आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याबाबत सविस्तर भाष्य केले आहे. तेच योग्य आहे. त्यामुळे आता कोणावरही खापर फोडणे किंवा कोणालाही दोष देणे योग्य नाही, असे संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्या विधानावर स्पष्ट केले.

शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. मात्र, जागावाटपात शेवटपर्यंत सुरू असलेल्या चर्चेमुळे काही प्रमाणात त्रास झाला. लोकसभेवेळी जागावाटप सोपे होते. एखाददोन जागा सोडल्यास कोणतेही वाद नव्हते. मात्र, विधानसभेवेळी काही जागांवरून तेढ निर्माण झाली, ती चुकीची होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;