Breast Feeding Benefits – स्तनपान केवळ बाळासाठी नाही तर आईच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे! वाचा

Breast Feeding Benefits – स्तनपान केवळ बाळासाठी नाही तर आईच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे! वाचा

बाळ घरात आल्यावर, आईसाठी एका वेगळ्या वाटेवरचा प्रवास होतो. हा प्रवास केवळ मानसिक नसतो तर भावनिकही असतो. शारीरिक दृष्टीने स्त्रिच्या शरीरामध्ये सुद्धा खूप सारे बदल होत असतात. या बदलाचाच एक भाग म्हणजे स्तनपान. पहिलं मूल झाल्यावर, बरेचदा स्तनपान करण्यासाठी अनेक स्त्रिया कचरतात. नवमातांना स्तनपान म्हणजे आपल्या फीगरची वाट लागेल असंच वाटत असतं.

स्तनपान हे नवजात बाळासाठी वरदान मानले जाते. बाळाच्या विकासात स्तनपान महत्वाची भूमिका बजावते. वर्षानुवर्षे, स्तनपानाच्या आरोग्य फायद्यांबद्दल बरेच सांगितले गेले आहे.

ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या मातेने गुलकंद खाण्याचे फायदे!

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यांसाठी मातांना देण्याची शिफारस करते.

तान्ह्या बाळासाठी मातेचे दूध हा परिपूर्णच नाही तर पोषक आहार आहे. म्हणून आता परदेशातही स्तनपान करण्यावर भर दिला जात आहे आणि जागृतीही होत आहे.

स्तनपानामुळे तान्ह्या बाळांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच बाळाची योग्य वाढ होण्यास स्तनपान महत्त्वाचे आहे.

आईचे दूध बाळांना आदर्श पोषण देते. यात जीवनसत्त्वे, प्रथिने आणि चरबी यांचे परिपूर्ण मिश्रण आहे आणि हे सर्व सहज पचण्यायोग्य आहे. आईच्या दुधात इम्युनोग्लोब्युलिन आणि प्रतिपिंडे असतात जी आपल्या बाळाला व्हायरस आणि बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात.

स्तनपान करताना, स्तनांची स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. आपल्या बाळाला शक्य तितक्या वेळा, दर दोन तासाने स्तनपान द्यावे. आईचे दूध लवकर पचते, म्हणून दोन तासांनी दूध पाजणे गरजेचे आहे. आईचे दूध आणि गाईचे दूध हे तुलनात्मक दृष्ट्या एकच मानले जाते. त्यामुळेच काही महिलांना दूध येत नाही, तेव्हा तान्ह्या बाळाला फिडींग बॅंक किंवा गाईचे दूध दिले जाते.

आईचे दूध हे बाळासाठी पोषणाचे सर्वोत्तम, सुलभ आणि सर्वात सुलभ स्त्रोत आहे. इम्युनो ग्लोब्युलिन आणि अँटीबॉडीज च्या उपस्थितीमुळे, आईचे दूध लहान मुलांना सर्दी, फ्लू, न्यूमोनिया आणि इन्फेक्शन सारख्या आजारांपासून वाचवण्यास मदत करते. स्तनपानामुळे मधुमेह तसेच काही प्रकारचे स्तनांचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.

स्तनपानामुळे स्त्रियांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते. तसेच डायबेटीज आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येवरही नियंत्रण मिळवता येते. म्हणूनच स्तनपान हे केवळ बाळासाठी नाही तर आईसाठी सुद्धा वरदानापेक्षा कमी नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल