मला लगीन कराव पाहिजे! जेफ बेजोस यांचा आज शाही विवाह सोहळा
ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत असलेले जेफ बेजोस हे उद्या, शुक्रवारी प्रेयसी लॉरेन सांचेझसोबत लग्नगाठ बांधणार आहेत. बेजोस हे 61 वर्षांचे, तर लॉरेन 55 वर्षांच्या आहेत. यांचा हा विवाह शाही सोहळा असून या लग्नासाठी हॉलीवूड स्टार, जगभरातील बिझनेसमॅन, ग्लोबल लीडर्स यांच्यासह जगभरातील प्रसिद्ध मंडळी उपस्थित राहणार आहे. या लग्नाला 250 व्हीआयपी पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
या लग्नासाठी 7 हजार 139 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. यातील 78 कोटी रुपये केवळ फुलांवर खर्च केले जाणार आहेत. 726 कोटी रुपये प्लॅनर्सवर, 717 कोटी रुपये लग्न स्थळावर आणि 713 कोटी रुपये सांचेझच्या ड्रेसेसवर खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे हे लग्न जगातील सर्वात महागडे लग्न ठरणार आहेत. लग्नासाठी पाहुण्यांना आणण्यासाठी खासगी विमाने रवाना झाली आहेत. या लग्नासाठी येणाऱया प्रत्येक पाहुण्यावर किमान 47 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत, असे बोलले जात आहे. हे लग्न तीन दिवस चालणार आहे.
लग्नाला यायचं हं!
या लग्नासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी, तिचा पती जेरेड कुशनर, मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स, हॉलीवूडमधील ओप्रा विन्फ्रे ऑरलँडो ब्लूम, कॅटी पेरी, किम कार्दशियन, क्रिन्स जेनर यांच्यासह जगभरातील मान्यवर मंडळी लग्नाला उपस्थित राहणार आहे. या सर्वांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहे. या हॉटेलमधील एका रुमचे एका रात्रीचे भाडे 2 लाख रुपये आहे.
पाहुण्यांना महागडे गिफ्ट
लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना लगुना बी कंपनीने बनवलेल्या खास बॅग मिळतील. लगुना बी वेनिसची प्रीमियम ग्लास कंपनी आहे. या कंपनीच्या बॅगा शानदार हँडमेड ग्लासवेयरच्या असतात. या बॅगेत नेमके काय काय असेल याचा खुलासा अद्याप करण्यात आला नाही. तसेच या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांनी कोणतेही गिफ्ट घेऊन येऊ नये, अशी विनंतीसुद्धा करण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List