ऐतिहासिक ठेवा असलेल्या शाहूकालीन व शहराच्या ऐतिहासिक जागा लाटणाऱ्यांविरोधात शिवसेनेची निदर्शने

ऐतिहासिक ठेवा असलेल्या शाहूकालीन व शहराच्या ऐतिहासिक जागा लाटणाऱ्यांविरोधात शिवसेनेची निदर्शने

सत्ता आणि पैशांच्या जोरावर ऐतिहासिक ठेवा असलेल्या शाहूकालीन व शहराच्या मोक्याच्या जागा हडप करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जनआंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर सत्तेचा दबाव आणि सरकारी हातमिळवणीतून कावळा नाका परिसरातील शासकीय रेस्ट हाऊस जागा विक्रीचा झालेला डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. पण, खासगी बिल्डरने जागा कुलूपबंद केल्याने संतप्त शिवसैनिकांनी प्रवेशद्वारासमोरच छत्रपती शाहू महाराज तसेच सर विश्वेश्वरया यांच्या प्रतिमेचे पुजन करून निषेध नोंदविला. या वेळी बिल्डरधार्जिण्या सरकारसह दडपशाही करणाऱ्या पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजीने वातावरण तणावपूर्ण बनले होते.

सत्तेच्या दुरुपयोगातून काही ठराविक बिल्डरांना हाताशी धरून मोक्याच्या सरकारी, निमसरकारी जागा पद्धतशीरपणे कवडीमोल दरात हडप करण्याचा उद्योग सुरू आहे. काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही यामध्ये सहभाग दिसून येत आहे. यातूनच जयप्रभा स्टुडिओ, अमेरिकन मिशन जागा, मिरजकर तिकटी येथील महसूल भवन, शालिनी स्टुडिओ, उपजिल्हाधिकारी यांचा बंगला आदी सरकारी जागा हडप करून, कोटय़वधी रुपयांची लूट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी या जागेवर जाऊन बंदिस्त पत्रे काढण्यासह छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न विश्वेश्वरया यांच्या प्रतिमांचे पुजन करणार असल्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार तसेच सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. आंदोलनात करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;