‘अलमट्टी’, ‘हिप्परगी’तील पाणीसाठ्याने कोल्हापूर, सांगली जिल्हा धोक्यात; कर्नाटक सरकारचा आडमुठेपणा

‘अलमट्टी’, ‘हिप्परगी’तील पाणीसाठ्याने कोल्हापूर, सांगली जिल्हा धोक्यात; कर्नाटक सरकारचा आडमुठेपणा

केंद्रीय जल आयोगाच्या नियमाकडे सपशेल दुर्लक्ष करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या आडमुठय़ा धोरणामुळे कोल्हापूरसह सांगली जिह्यावर पुराचे संकट ओढावण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अलमट्टीसह हिप्परगी धरणामध्ये केंद्रीय जल आयोगाच्या नियमापेक्षा अधिक पाणीसाठा ठेवण्यात आला आहे. या गंभीर बाबीकडे पत्राद्वारे लक्ष वेधूनही केंद्रीय जल आयोगाकडून कानाडोळा करण्यात आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारसुद्धा उदासीन असल्याचे चित्र आहे.

अलमट्टी धरणाच्या उंचीवाढविरोधी सर्वपक्षीय संघर्ष समिती कोल्हापूर, सांगली व साताऱ्याच्या वतीने कोल्हापुरात उद्या कर्नाटक सरकारच्या आडमुठय़ा धोरणाविरोधात तसेच महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासंदर्भात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक होत आहे.

कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे. अलमट्टी धरणामध्ये 123 टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता असून, धरणात सध्या 72.25 टीएमसी पाणीसाठा आहे. धरण 61 टक्क्यांपेक्षा अधिक भरल्यामुळे सांगली, कोल्हापूर जिह्यांतील कृष्णा, वारणा, पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार जूनअखेर अलमट्टी धरणामध्ये 47 टक्के पाणीसाठा ठेवणे बंधनकारक आहे. पण कर्नाटक सरकारच्या आडमुठय़ा धोरणामुळे सध्या अलमट्टी धरणात 61 टक्के पाणीसाठा झाला आहे. शिवाय हिप्परगी बॅरजेचे सर्व दरवाजे पावसाळ्यात उघडे ठेवणे बंधनकारक असतानाही ते उघडे ठेवलेले नाहीत. परिणामी पाण्याचा फुगवटा राजापूर बंधाऱ्यापर्यंत आला आहे.

राज्य शासन विविध संघटनांनी केंद्रीय जल आयोगाकडे लेखी तक्रार करूनही आयोगाने कानाडोळा केला आहे. कर्नाटक सरकारला पत्रव्यवहार करूनही त्यांनी या पत्रांना केराची टोपली दाखविली आहे. कर्नाटक सरकारच्या या आडमुठय़ा धोरणाविरोधात महाराष्ट्र शासनाने या विरोधी आवाज उठविला पाहिजे; पण तसे दिसत नाही.

आज कोल्हापुरात बैठक

अलमट्टीविरोधात आंदोलनाची पुढील दिशा व धोरण ठरविण्यासाठी उद्या (दि. 27) कोल्हापुरात शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सतेज पाटील, आमदार अरुण लाड, माजी खासदार राजू शेट्टी, ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चिडमुंगे, कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे सर्जेराव पाटील, आर. जी. तांबे, जे. पी. लाड, विक्रांत पाटील-किणीकर आदी लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;