हिंदुस्थानसोबत ‘मोठ्ठा’ व्यापार करार करणार! डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

हिंदुस्थानसोबत ‘मोठ्ठा’ व्यापार करार करणार! डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचे क्रेडिट घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेने चीनसोबतच्या व्यापार करारावर हस्ताक्षर केले असून लवकरच हिंदुस्थानसोबतही मोठ्ठा करार होईल, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ‘बिग ब्युटीफूल बिल’ या कार्यक्रमामध्ये बोलताना ट्रम्प यांनी ही घोषणा केली.

प्रत्येकजण आमच्यासोबत करार करू इच्छित आहे. आम्ही नुकताच चीनसोबत व्यापार करार केला आहे. असा करार आम्ही सर्वांसोबत करणार नाही. पण आगामी काळात आम्ही काही चांगले करार करणार आहेत. कदाचित हिंदुस्थानसोबतही खूप मोठा करार आहोत, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प पुढे जोर देऊन म्हणाले की, आम्ही इतर सर्वच देशांशी करार करणार नाही. काही लोकांना आम्ही पत्र पाठवणार आहोत. त्यांना 25, 35, 45 टक्के (टेरिफ) भरावेच लागतील. माझी लोक तसे करू इच्छित नाही, पण हाच सोपा मार्ग आहे.

त्यांना काही करार करायचे आहेत, पण माझ्यापेक्षाही जास्त करार करायचे आहेत. आम्हीही काही चांगले करार करणार असून यापैकी एक कदाचित हिंदुस्थानसोबत होईल. आम्ही हिंदुस्थानसाठी दरवाजे उघडणार आहोत. चीनसाठीही दरवाजे उघडणार आहोत. आमचे प्रत्येक देशाशी चांगले संबंध आहेत, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.

ट्रम्प तोंडावर आपटले! इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला फसला; युरेनियमचा साठा सुरक्षित, पेंटागॉनचा गुप्त अहवाल फुटला!

दरम्यान, ट्रम्प यांनी चीनसोबत झालेल्या कराराचा तपशील सविस्तरपणे मांडला नाही. मात्र व्हाईट व्हाऊसच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. हा करार दुर्मिळ खनिजांबाबत असल्याची पुष्टी त्यांनी केली. या खनिजांच्या बदल्यात अमेरिकेने चीनवर लादलेला टेरिफ कमी केला आहे.

हिंदुस्थानी वंशाच्या जोहरान ममदानी यांचा महापौर निवडणुकीत जलवा, मतदारांना उद्देशून मारला डायलॉग खूप गाजतोय

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;