इटलीच्या फॅशन शोमध्ये झळकली कोल्हापुरी चप्पल; ‘प्रादा’ने केली चप्पलची कॉपी, कारागिरांसह कोल्हापूरकरांचा संताप

इटलीच्या फॅशन शोमध्ये झळकली कोल्हापुरी चप्पल; ‘प्रादा’ने केली चप्पलची कॉपी, कारागिरांसह कोल्हापूरकरांचा संताप

इटली येथील मिलान शहरात झालेल्या जगप्रसिद्ध फॅशन शोमध्ये सहभागी मॉडेलनी लाखाच्या घरात किंमत असलेल्या कोल्हापुरी चप्पल घालून रॅम्प वॉक केला. या चपलेवर एका परदेशी खासगी कंपनीचे नाव होते; पण हिंदुस्थानसह प्रामुख्याने कोल्हापूरचा कुठेच उल्लेख न झाल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. कोल्हापुरातील कारागीरांनी या आलिशान चपलेबद्दल शंका उपस्थित केली असून, जीआय मानांकन असतानाही ‘प्रादा’ या खासगी कंपनीने हुबेहूब कोल्हापुरी चप्पल जागतिक व्यासपीठावर झळकवली कशी? असा सवालही उपस्थित केला जाऊ लागला आहे.

इटली येथे नुकत्याच झालेल्या ‘फॅशन शो’मध्ये धडकलेल्या कोल्हापुरी चप्पलला खासगी कंपनीने आलिशान टच दिला आहे. यामुळे विदेशातील चप्पलप्रेमींमध्ये ही कोल्हापुरी चप्पल अल्पावधीतच लोकप्रिय झाली. एकीकडे जागतिक मंचावर मान्यताप्राप्त स्थान मिळाल्याने आणि जगभरातील अनेक मॉडेल्सनी ही चप्पल परिधान करून व्यासपीठावर सादरीकरण केल्याचे व्हिडीओ तसेच फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. पण संबंधित खासगी कंपनीने हिंदुस्थानचा, महाराष्ट्राचा आणि कोल्हापूरचा कुठेच उल्लेख न केल्यामुळे सोशल मीडियावर कोल्हापुरी चप्पलप्रेमींकडून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.

उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता

कोल्हापूर जिह्यात अनेक कोल्हापूर चप्पल उत्पादन करणारे व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे कोल्हापुरी, कापशी, कुरुंदवाडी, धनगरी, रुबाबदार शाहू कोल्हापुरी चप्पल हस्तकलेच्या माध्यमातून बनवणारे कारागीर आजही उपलब्ध आहेत. वेगवेगळे चपलेचे ब्रँड आले; पण कोल्हापुरी चपलेचा रुबाब आजही कायम आहे.यामुळे मूळ कोल्हापुरी चपलेत छेडछाड करून जागतिक ब्रँडने केलेल्या या प्रकारामुळे उत्पादनाला फटका बसण्याच्या शक्यतेने कोल्हापूरकरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोल्हापुरी चपलांना ‘जीआय’ टॅग मिळालेले जिल्हे
सन 2019 साली भारत सरकारच्या पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्क महानियंत्रक कार्यालयाने या चपलांना भौगोलिक निर्देशांक ‘जीआय’ टॅग दिला होता. याचा अर्थ या चपलांची विशिष्टता आणि पारंपरिकता फक्त काही ठरावीक भौगोलिक भागांशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या जिह्यांना जीआय मानांकन मिळाले आहे. तर कर्नाटकमधील धारवाड, बेळगाव, बागलकोट, विजयपूर या जिह्यांनाही भौगोलिक मानांकन मिळाले आहे.

केंद्र सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करावा
याबाबत परंपरागत कोल्हापुरी चपलेचे कारागीर असलेल्या कोल्हापुरातील व्यावसायिकांशी संवाद साधला असता, कारागीरांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एखाद्या वस्तूला जीआय मानांकन असेल तर खासगी कंपनीला कोणतेही अधिकार मिळत नाहीत. यामुळे हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून गेल्या 700 वर्षांहून अधिक काळ लोकप्रिय असलेल्या तसेच कोल्हापुरातील हस्तकला कारागीरांच्या रोजीरोटीचा प्रश्न असलेल्या कोल्हापुरी चपलेला एखाद्या मोठय़ा ब्रँडने जागतिक व्यासपीठावर सादर केले, तर मूळ कोल्हापुरी चप्पल कारागीरांना याचा काहीच लाभ होणार नाही. तसेच अनेक प्रकारच्या कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागीरांवर उपासमारीची वेळ येईल, यामुळे केंद्र सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी कोल्हापुरी चपलेला जीआय मानांकन मिळवून देण्यासाठी लोकलढा उभा करणाऱ्या कोल्हापुरातील कारागीरांकडून होऊ लागली आहे.

कोल्हापुरी चपलेच्या नावावर काहीही खपवून घेतले जाणार नाही
ज्या खासगी कंपनीने आलिशान आकारात हुबेहूब कोल्हापुरी चप्पल जगासमोर आणली, त्या कंपनीने या चपलेची किंमत एक लाख 23 हजार इतकी लावली आहे. मुळात संपूर्ण हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली आणि नैसर्गिक चमडय़ापासून बनवलेली कोल्हापुरी चप्पल इतक्या महागडय़ा किमतीत आत्तापर्यंत कारागीरांकडून कधीच विकली गेली नाही, त्यामुळे मोठय़ा कंपन्यांनी केलेली ही चूक मूळ कोल्हापुरी चपलेच्या ब्रँडवर गदा येऊ शकते. कोल्हापुरी चपलेच्या नावाखाली काहीही खपवून घेणार नाही, अशा भावनाही कोल्हापुरातील कारागीरांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाळाचा जन्म दाखला आता डिस्चार्जपूर्वीच मिळणार, केंद्राचे राज्यांना आदेश जारी बाळाचा जन्म दाखला आता डिस्चार्जपूर्वीच मिळणार, केंद्राचे राज्यांना आदेश जारी
सरकारने सर्वसामान्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. रजिस्ट्रार कार्यालयाने सर्व राज्यांना नवजात बालकांच्या मातांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यापूर्वी बाळाचा जन्म प्रमाणपत्र...
Beed Crime – क्लासेसमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार, घटनेने बीडमध्ये खळबळ; दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल, आरोपी फरार
संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटी रुपयांची तीन एकर जमीन भेट! आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 19 गाड्या डिझेल ऐवजी पाणी भरून आल्या! नेमकं काय घडलं?
पुन्हा गलवान नको! राजनाथ सिंह यांनी चीनला सुचवला 4 कलमी फॉर्म्युला
इराणचा इस्रायल, अमेरिकेला चकवा! कोणालाच थांगपत्ता लागला नाही अन् गुप्त अण्वस्त्र तळ तयार झाला
गजराज बिथरला! अहमदाबादच्या जगन्नाथ रथयात्रेत हत्तींचा थरार, भाविकांची पळापळ