‘चल हल्ला बोल’ नामदेव ढसाळांवरील चित्रपट फक्त प्रौढांसाठी! सेन्साॅर बोर्डाचा अजब निर्णय

‘चल हल्ला बोल’ नामदेव ढसाळांवरील चित्रपट फक्त प्रौढांसाठी! सेन्साॅर बोर्डाचा अजब निर्णय

नामदेव ढसाळ यांच्यावरील ‘चल, हल्ला बोल या चित्रपटाला परवानगी नाकारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाने चित्रपट प्रदर्शनाला अखेर परवानगी दिली आहे. जवळपास 11 महिन्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सेन्सॉर बोर्डाकडून परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु यातील महत्त्वाची बाब म्हणजे या चित्रपटातील काही शब्दांवर मात्र आजही बंदी कायम असणार आहे. यामध्ये काॅम्रेड लाल सलाम, दलित या शब्दांवर बंदी कायम आहे. तसेच या चित्रपटाला प्रौढांसाठी असेल असे घोषित करण्यात आले आहे.

 

कोण नामदेव ढसाळ? असं विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाविरुद्ध जोरदार एल्गार; नामदेव ढसाळांच्या कवितांचं वाचन

‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट दलित पँथर चळवळीवर आधारित असून, हा चित्रपट प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांचा जीवनपट आहे. या चित्रपटातील नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला असून, चित्रपटा मध्ये शिवराळ भाषेचा उल्लेख आहे असे म्हटले होते. त्यामुळे हा वाद फार टोकाला पोहोचला होता. निर्माते आणि सेन्सॉर बोर्ड यांच्यातील हा वाद आता शमला आहे. हा चित्रपट 2024 ऑगस्ट पासून सेन्साॅर बोर्डाकडे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रलंबित होता.

वेब सीरीज किंवा इतर चित्रपटातील भाषेवर कुठलीही बंधनं नसताना या चित्रपटावर इतकी बंधनं का असा प्रश्न या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी विचारला आहे. शब्दांवर घातलेल्या या बंदीमुळे तसेच चित्रपट फक्त प्रौढांसाठी असेल, यामुळे आता बनसोडे यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहेत.

‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट दलित पँथर तसेच युवा क्रांती दल यांच्यातील चळवळीवर बेतलेला चित्रपट आहे. परंतु सेन्साॅर बोर्डाने यातील शिवराळ भाषेवर आणि नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आक्षेप घेतला होता. कवितांमध्ये शिव्या आणि अश्लीलता असल्याचे सेन्साॅर बोर्डाने मत व्यक्त केले होते. नामदेव ढसाळांबद्दल माहीती देताच, कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न सेन्साॅर बोर्डाकडून विचारण्यातही आला होता. “कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही”. या सेन्साॅर बोर्डातील अधिकाऱ्याच्या वक्तव्यामुळे दलित चळवळीतील कार्यकर्ते  तसेच महाराष्ट्रातील जनतेकडूनही संताप व्यक्त करण्यात आला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;