‘जिओ’ आयुष्यातील सर्वात मोठी जोखीम होती, मुकेश अंबानींनी केला खुलासा

‘जिओ’ आयुष्यातील सर्वात मोठी जोखीम होती, मुकेश अंबानींनी केला खुलासा

जिओ या टेलिकॉम सेक्टरमध्ये गुंतवणूक करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जोखीम आणि धाडस होते, असे वक्तव्य रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी केले. रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय सोपा नव्हता, असा खुलासा मुकेश अंबानी यांनी केला. एका मुलाखतीत मुकेश अंबानी यांनी ‘जिओ’मधील गुंतवणुकीबाबत भाष्य केले. ते म्हणाले, रिलायन्स इंडस्ट्रीजने 4जी मोबाइल नेटवर्क स्थापण्यासाठी स्वतःचे अब्जावधी डॉलर गुंतविले. मात्र हे पाऊल आर्थिकदृष्ट्या यशस्वी होणार नाही. कारण हिंदुस्थानात सध्या डिजिटल तंत्रज्ञानासाठी तयार नाही, असे त्या वेळी काही विश्लेषकांना वाटत होते, असा खुलासाही मुकेश अंबानी यांनी यावेळी केला.

नेहमीच मोठे धोके स्वीकारले

आम्ही नेहमीच मोठे धोके स्वीकारले आहेत. मी स्वतः बहुसंख्य भागधारक होतो, असे अंबानी म्हणाले. जिओच्या प्रवेशामुळे डेटा सेवांची किंमत लक्षणीयरीत्या कमी झाली. ज्यामुळे ग्रामीण आणि वंचित भागातील लाखो देशवासीयांना इंटरनेटचा वापर परवडणारा झाला. आजघडीला हिंदुस्थानात 80 कोटींहून अधिक इंटरनेट युजर्स आहेत. जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या ऑनलाइन बाजारपेठांपैकी एक बनलो आहोत, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;