अंतराळ स्थानकात हिंदुस्थानचे पहिले पाऊल, शुभांशु यांना घेऊन झेपावलेले रॉकेट उतरले!

अंतराळ स्थानकात हिंदुस्थानचे पहिले पाऊल, शुभांशु यांना घेऊन झेपावलेले रॉकेट उतरले!

नासाच्या ऑक्सिऑम-4 मोहिमे अंतर्गत चार अंतराळवीरांना घेऊन बुधवारी अवकाशात झेपावलेले फाल्कन – 9 हे रॉकेट आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात उतरले. गुरुवारी सायंकाळी 4.16 मिनिटांनी यानाच्या डॉकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात भारताचे पहिले पाऊल पडले. या मोहिमेत सहभागी असलेले हिंदुस्थानी हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या रूपाने भारताला हा मान मिळाला आहे.

अमेरिकेच्या जॉन एफ केनेडी स्पेस सेंटरवरून काल दुपारी 12 वाजून 1 मिनिटाने फाल्कन-9 या रॉकेटने अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण भरले होते. उड्डाणानंतर काही तासांतच पृथ्वीच्या वातावरणातून बाहेर पडून रॉकेटने अंतराळात प्रवेश केला. तब्बल 28 तासांच्या प्रवासानंतर आज रॉकेटने अंतराळ स्थानकात नांगर टाकला.

अंतराळ स्थानकात लँड होण्यासाठी आवश्यक असलेला वेग आणि वेळेचे गुंतागुंतीचे गणित सोडवल्यानंतर रॉकेट स्थिरावण्याची प्रक्रिया सुरू झाली. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 4.01 मिनिटांनी मिशन पंट्रोलने ‘सॉफ्ट पॅप्चर’चा सिग्नल दिला. म्हणजे सुरुवातीचा संपर्क स्थापित झाला. त्यानंतर काही मिनिटांनंतर ‘हार्ड पॅप्चर’ म्हणजेच यान आणि अंतराळ स्थानकात मजबूत संपर्क स्थापित झाला आणि 4.15 मिनिटांनी डॉकिंग प्रक्रिया पूर्ण झाली.

‘आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचणं हा आमच्यासाठी सन्मान आहे. धन्यवाद! असे ऑक्सिऑम-4 च्या मोहिमेचे नेतृत्व करणारे अंतराळवीर पेगी व्हिटसन यांनी सांगितले.

शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सहकारी पुढील 15 दिवस अंतराळ स्थानकात राहून 60 प्रयोग करणार आहेत. त्यापैकी 7 प्रयोग हिंदुस्थानने सुचवले आहेत.

लहान बाळासारखा शिकतोय, एन्जॉय करतोय!

‘हे एक वेगळे आणि नवीन वातावरण आहे. एक नवीन आव्हान आहे. मी माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत हा अनुभव खरोखर एन्जॉय करतोय. चुका करणं चांगलं असतं, पण दुसऱयाकडून झालेल्या चुका पाहायला आणखी मजा येते. आमच्यासाठी हा एक मजेशीर अनुभव आहे. अंतराळात पोहोचल्यानंतर सुरुवातीला काही विशेष वाटलं नाही, मात्र नंतर आश्चर्यकारक अनुभव आला. रॉकेट लाँच झाल्यानंतर बराच वेळ मी झोपलो होतो, असं माझ्या सहकाऱयांनी सांगितलं. मला आता या वातावरणाची सवय होतेय. मी बाहेरच्या दृश्यांचा आनंद घेतोय. एखाद्या लहान बाळासारखा शिकतोय. नव्यानं पावलं टाकायला, चालायला शिकतोय. तोल सावरायला शिकतोय. खायला शिकतोय. हे सगळं खूपच रोमांचक आहे, असे शुभांशु म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;